या उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी

हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती. 

Updated: May 3, 2018, 05:24 PM IST
या उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी

मुंबई : हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती. धकाधकीचे जीवन, वेळी अवेळी खाणे, फास्टफूडचा अतिरेक याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे अनेकांना केसगळतीचा त्रासही होतो. केस गळतीच्या समस्येवर अनेकदा केमिकल उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र या उपायांनी केसगळती कमी होईलच असे नाही. मात्र घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करु शकता. या घरगुती उपायांनी अवघ्या एका महिन्यात तुम्ही केस गळती कमी होईल. 

कोरफडाच्या वापराने डोक्याच्या त्वचेवरील डेड सेल्स दूर होतात. कोरफड हे त्वचेचे रोमछिद्र साफ करुन केस वाढण्यास मदत करतात. यात सॅलिसिलिक अॅसिड असते. तसेच केरोटिनही पुरवते. केस वाढण्यामध्ये केरोटिनचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. कोरफडीचा गर केसांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर केस धुवा. केस गळणे कमी होईल.

मेथी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. यात अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट हे गुण असतात. केसांच्या वाढीसाठी हे गुण अतिशय उपयुक्त असतात. मेथीमुळे केस गळणे कमी होते. मेथीची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. 

कडुनिंबामध्ये अँटीबायोटिक, अँटी फंगल, जखम भरुन काढण्यासारखे गुण असतात. केसांशी संबंधित अनेक समस्यांवर कडुनिंब फायदेशीर ठरतो. केसांच्या त्वचेला खाज येत असेल तर त्यावर कडुनिंबाच्या वापराने फायदा मिळतो. कडुनिंबाची पाने आणि साल एकत्रित वाटून केसांना लावा. यामुळे केसांची योग्य वाढ होईल.

आवळ्यामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे कोलॅजन वाढीस मदत होते. कोलॅजनमुळे केस वाढतात. आवळ्याची पावडर पाण्यात मिक्स करुन केसांच्या मुळांना लावा. अर्धा तास तसेच ठेवा. थंड पाण्याने केस धुवा.