Yellow Teeth: पिवळे दात चमकवण्यासाठी घरगुती उपाय, काही दिवसात दिसेल फरक

पिवळे दात आज अनेकांसाठी समस्या बनली आहे. हसणे आपण रोखू शकत नाही. पण कधी कधी आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. दात पिवळे आणि घाण असतील तर तुम्ही चेष्टेचे विषय बनता. दात पिवळे पडल्यामुळे अनेकांना उघडपणे हसताही येत नाही. अनेक टूथपेस्ट ब्रँड दात पिवळेपणा दूर करण्याचा दावा करतात, परंतु काहीही होत नाही. आपल्याकडे अनेक असे घरगुती उपाय आहेत. ज्याद्वारे दातांचा पिवळेपणा दूर केला जावू शकतो.

Updated: Nov 12, 2022, 10:52 PM IST
Yellow Teeth: पिवळे दात चमकवण्यासाठी घरगुती उपाय, काही दिवसात दिसेल फरक title=

Yellow Teeth Cleaning : पिवळे दात आज अनेकांसाठी समस्या बनली आहे. हसणे आपण रोखू शकत नाही. पण कधी कधी आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. दात पिवळे आणि घाण असतील तर तुम्ही चेष्टेचे विषय बनता. दात पिवळे पडल्यामुळे अनेकांना उघडपणे हसताही येत नाही. अनेक टूथपेस्ट ब्रँड दात पिवळेपणा दूर करण्याचा दावा करतात, परंतु काहीही होत नाही. आपल्याकडे अनेक असे घरगुती उपाय आहेत. ज्याद्वारे दातांचा पिवळेपणा दूर केला जावू शकतो.

बेकिंग सोडा

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी ब्रशवर बेकिंग सोडा घ्या आणि ब्रश करा. 10-12 दिवस हा उपाय करून पाहिल्यास काही दिवसातच तुमचे दात चमकू लागतील.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल आणि सैंधव मीठ लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.  सैंधव मीठात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यात लोह, आयोडीन, लिथियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम, क्रोमियम, लिथियम, सोडियम, क्लोराईड ही खनिजे आढळतात. मोहरीचे तेल या मिठात मिसळून बोटाने चोळा.

लिंबू आणि संत्र्याची साल

लिंबू आणि संत्र्याची साल दातांवर चोळल्यानेही दात स्वच्छ होतात. यामध्ये असलेले पोषक तत्व दातांवरील प्लेक आणि पिवळसरपणा दूर करतात. या रेसिपीने तुम्हाला काही दिवसात आराम मिळेल. जास्त घासणे टाळावे.

स्ट्रॉबेरी आणि गरम पाणी

स्ट्रॉबेरी असलेली अनेक टूथपेस्ट आहेत. पण स्ट्रॉबेरी थेट दातांवर लावल्यानेच दातांचा पिवळेपणा दूर होतो. स्ट्रॉबेरी दातांवर घासल्यानंतर ब्रश करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. दात स्वच्छ होतील.

(Disclaimer: ही एक सामान्य माहिती आहे. झी मीडिया याची पुष्टी करत नाही.)