रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Updated: Jul 29, 2018, 06:56 PM IST
रूबाबदार  दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय  title=

मुंबई : विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटींमुळे पुन्हा मुलांच्या बिअर्ड लूककडे मुली आकर्षित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हीदेखील दाढी वाढवत असाल तर काही गोष्टींचं भान सांभाळणं आवश्यक आहे. सोबतच रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी कोणत्या घरगुती टीप्स फायदेशीर ठरतील? हेदेखील नक्की जाणून घ्या. 

रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी खास टीप्स - 

दालचिनी आणि लिंबू - 

दालचिनीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहर्‍यावर किमान 15 मिनिटं लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. संवेदनशील त्वचा असल्यास दालचिनी आणि लिंबू या दोन्हींमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. यामुळे पॅच टेस्ट करूनच हा उपाय करावा. 

खोबरेल तेल - 

खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. दाढी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्त्याची काही पानं मिसळून तेल उकळा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचा मसाज करा. शेव्ह करण्यापूर्वी कोमट पाण्यात खोबरेल तेलाचे थेंब मिसळून चेहरा स्वच्छ धुवावा.

आवळा - 

आवळा केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. दाढीचे केस वाढवण्यासाठी आवळ्याचं तेल फायदेशीर ठरतं. त्यामुळे किमान 20 मिनिटं आवळ्याच्या तेलाने मसाज करा. आवळ्याचा आहारात समावेश करणंदेखील फायदेशीर ठरतं. थेट आवळ्याचं तेल त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे यासोबत ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाचं तेल मिसळून मसाज करा. 

केसांच्या वाढीसाठी  या बाह्य उपचारांसोबतच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. यासाठी मुबलक पाणी प्या. आहारात संतुलित जेवणाचा समावेश करावा.मद्यपान आणि धुम्रपानापासूनही दूर रहा.