या उपायांंनी अवघ्या मिनिटाभरात थांबेल भळाभळा वाहणारं रक्त

स्वयंपाकघरामध्ये घाईत काम करताना अनेकदा नकळत बोटही कापले जाते.

Updated: Jul 22, 2018, 03:13 PM IST
या उपायांंनी अवघ्या मिनिटाभरात थांबेल भळाभळा वाहणारं रक्त  title=

मुंबई : स्वयंपाकघरामध्ये घाईत काम करताना अनेकदा नकळत बोटही कापले जाते. बोट कापलं गेलं की भळाभळा रक्त वाहायला सुरूवात होते. अशावेळेस अनेकजण घाबरून जातात. मात्र वेळीच काही घरगुती उपाय केल्यास हे वाहणारं रक्त थांबवायला मदत होते. 

रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय  

बर्फ - 

वाहणारं रक्त थांबवायचं असेल तर तात्काळ बर्फ लावा. यामुळे क्लॉटिंग होण्यास मदत होते. सोबतच दाहशामक आणि थंडावा निर्माण करण्याची क्षमता बर्फामध्ये असल्याने आराम मिळतो.  

हळद - 

हळदीमध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तसेच इंफेक्शन रोखण्याची क्षमता असल्याने ते फायदेशीर ठरते. धडपडल्यानंतर वाहणारं रक्त थांबवण्यासाठी हळद मदत करते. यामुळे जखमेमध्ये इंफेक्शन पसरत नाही. 

तुरटी - 

तुरटीमध्येही अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जखमेवर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास त्यावर तुरटी फिरवा. यामुळे वहणारे रक्त थांबते. पुन्हा रक्ताचं क्लॉटिंग होण्याच्या क्रियेला चालना मिळते. सोबतच इंफेक्शनचा धोकाही कमी होतो. 

टी बॅग्स - 

टी- बॅगसचा वापरही रक्त थांबवण्यासाठी केला जातो. चहामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म जखमेवर प्रभावी ठरतात. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो. टी बॅग्स पाण्यामध्ये 10 सेकंद बुडवून ठेवा त्यानंतर ती जखमेवर ठेवा. 10 मिनिटं जखमेवर दाबून ठेवल्यानंतर रक्त वाहण्याचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होते.