स्त्री आणि पुरूषांमधील मद्यसेवनाच्या व्यसनाचे नवे धक्कादायक खुलासे

आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. 

Updated: Jul 2, 2018, 06:36 PM IST
स्त्री आणि पुरूषांमधील मद्यसेवनाच्या व्यसनाचे नवे धक्कादायक खुलासे  title=

मुंबई : आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. अनेक ठिकाणी मुलींनी मुलांशी बरोबरी केली आहे. मग ही बरोबरी जशी चांगल्या कामामध्ये झाली आहे तशीच ती मद्यसेवनाच्या सवयीमध्येही झाली आहे. 

1991 ते 2000 या काळात जन्मलेल्यांच्या आजच्या लाईफस्टाइलचा अभ्यास केल्यास या तरूणांमध्ये मदयसेवनाचे प्रमाण सारखेच आहे. मद्यसेवनाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. 2000 - 2015 या काळातील अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या अहवालानुसार, मद्यसेवनामुळे 45-64 या वयोगटातील यकृताचे नुकसान होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये 57% तर पुरूषांमध्ये 21% आहे. तसेच हे प्रमाण स्त्रियांमध्ये 18% वाढले असून पुरूषांमध्ये 10% कमी झाले आहे. मद्यसेवनाच्या दुष्परिणामामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. याचा अर्थ असा होत नाही की स्त्रियांचे मद्यसेवनाचे प्रमाण वाढले आहे. 

स्त्रियांना मद्यसेवन का ठरते अधिक नुकसानकारक?  

संशोधकांच्या दाव्यानुसार, अल्कोहल पचण्यासाठी यकृताकडून अल्कोहल डी - हाईड्रोजिनेस नावाचे एन्झाईम वाहते. महिलांच्या शरीरात हे एन्झाईम वाहण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांच्या यकृताचे नुकसान होण्याचे प्रमाण  अधिक आहे. मद्यसेवनाच्या आहारी गेलेल्यांमध्ये इतर पदार्थांची नशा जडण्याची शक्यता अधिक आहे. 

मद्यसेवनाचा महिल्यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम 

मद्यसेवनाच्या सवयीमुळे महिलांचे केवळ यकृत बिघडते असे होत नाही. तर याचा परिणाम महिलांच्या हृद्यावर आणि नसांवरही घातक परिणाम करते. मद्यसेवनाचा स्त्री आणि पुरूषांच्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. 

लैंगिक भेदभाव उघड - 

पूर्वी मद्यसेवन किंवा त्याच्याशी निगडीत संधोधनामध्ये प्रामुख्याने पुरूषांचा समावेश केला जात असे. मात्र आता मद्यसेवनाच्या परिणामांचा धोका ओळखण्यासाठी पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही विचार केला जातो.  

व्यसनामागील कारणं वेगवेगळी  

स्त्री आणि पुरूषांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण सारखेच असले तरिही या व्यसनामागे कारणं मात्र वेगवेगळी आहेत. स्त्रिया त्यांच्यावर होणारा इमोशनल अत्याचारापासून दूर जाण्यासाठी मद्यसेवनाची मदत घेतात तर पुरूषांमध्ये सामाजिक दाबावामधून व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x