Diabetes ची 'ही' दोन लक्षणे तोंडाच्या आतील भागात दिसतात, तुम्हालाही हा त्रास जाणवला का?

Diabetes Symptoms : दिवसेंदिवस मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे ही लक्षणे केवळ शरीरातच नव्हे तर तोंडातील आतील भागात दिसून येतात. पण ही लक्षणे कशी ओळखायची ते जाणून घ्या... 

Updated: Jun 3, 2023, 04:59 PM IST
Diabetes ची 'ही' दोन लक्षणे तोंडाच्या आतील भागात दिसतात, तुम्हालाही हा त्रास जाणवला का? title=
Diabetes Symptoms In Mouth

Diabetes Symptoms In Mouth : मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या (Diabetes) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, वाढलेले वजन ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेहाचे (diabetes) दोन प्रकार आहेत, टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाईप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन अजिबात होत नाही. आणि टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिनची कमी प्रमाणात उत्पादन होते. मधुमेह असलेल्या लोकांपैकी 90 टक्के लोकांना टाइप 2 मधुमेह आहे. त्याची लक्षणे वेळीच ओळखली गेल्यास मधुमेहावरील उपचार लवकर सुरू करता येतात. 

मधुमेहाचा (diabetes) आजार हळूहळू मानवी शरीराला पोकळ बनवतो, म्हणूनच याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नीट नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयविकार आणि मज्जातंतूंचे नुकसान होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, 2019 मध्ये मधुमेह हे मृत्यूचे नववे प्रमुख कारण आहे. 

तोंडाच्या आत मधुमेहाची लक्षणे (Diabetes Symptoms In Mouth)

मधुमेहाची दोन्ही लक्षणे तोंडाच्या आतील भागात दिसून येतात. असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, हीच लक्षणे लोकांच्या सहज लक्षात येत नाहीत. परिणामी, शरीरात त्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरडे तोंड म्हणजे तोंडात कोरडेपणा आणि तोंडाला गोड किंवा फळांचा वास येणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. हीच लक्षणे उच्च रक्तदाब किंवा हायपोग्लायसेमियाशी संबंधित असू शकतात.

2018 ते 2019 या काळात टाइप 2 मधुमेहाचे प्रमाण 7 टक्क्यांनी कमी झाले होते. मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण त्यांना त्यांची ग्लुकोजची पातळी सामान्य ठेवणे आवश्यक आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, उच्च रक्तातील साखरेची पातळी डायबेटिक केटोआसिडोसिस (KDA) सारख्या जीवघेण्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

- सतत तहान लागणे
- सतत लघवीला जाणे
- आजारी असल्यासारखे वाटणे
- थकवा
- धुसर दिसणे
- अचानक वजन वाढणे
- जखमा उशीरा बर होणे.

जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही आधीच मधुमेही असाल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.

फळाचा रस
ड्रायफ्रुट्स
दुधाचे पदार्थ
कॉफी