Black Neck remedies: चेहरा गोरा पण मान काळी...हा पॅक करेल मदत...

मान काळी पडण्यामागे खूप कारणं असतात, कधी अस्वच्छपणा, टॅनिंग , नकली दागिने घातल्याने होणारं इन्फेक्शन, अशी अनेक कारणं आहेत. आपण हे डाग घालवण्यासाठी खूप प्रयत्न करतो,अनेक महागड्या क्रीम्स वापरतो पण फरक मात्र पडत नाही

Updated: Jan 18, 2023, 03:22 PM IST
Black Neck remedies: चेहरा गोरा पण मान काळी...हा पॅक करेल मदत...  title=

Solution for dark neck: सौंदर्य हा तसा सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे. सुंदर दिसणं प्रत्येकालाच हवं असतं.पण सौंदर्य हे क्षणभंगुर असतं असं म्हणतात, वय वाढत गेलं कि त्याचा परिणाम आपल्या सुंदरतेवर होऊ लागतो चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम लवकर दिसू लागतो. 
चेहऱ्यावर पुरळ येणं, सुरकुत्या येणं अश्या अनेक समस्या आपल्याला जाणवू लागतात. हात पायाची त्वचा काळी पडणे किंवा मानेच्या मागे काळपट थर जमा झाला असेल तर मात्र आपल्याला चारचौघात जाताना थोडं अवघडल्यासारखं वाटतं. (How do you get rid of dark spots on your neck know everything in marathi )

मान काळी पडण्याची अनेक कारणं

मान काळी पडण्यामागे खूप कारणं असतात, कधी अस्वच्छपणा, टॅनिंग , नकली दागिने घातल्याने होणारं इन्फेक्शन, अशी अनेक कारणं आहेत. आपण हे डाग घालवण्यासाठी खूप प्रयत्न करतो,अनेक महागड्या क्रीम्स वापरतो पण फरक मात्र पडत नाही आणि मग होतं असं की चेहरा गोरापान दिसतो आणि मान काळी दिसू लागते. 
पण आज आपण यावर एक सोपा आणि झटपट असा पर्याय शोधला आहे चला तर मग जाणून घेऊया.
 
संत्र्याच्या सालीच्या पावडरपासून तयार केलेला पॅक

 साहित्य 

  • संत्र्याच्या सालींची पावडर 
  • दूध 
  • लिंबू 

कसा तयार कराल फेसपॅक 

हा फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याच्या साली उन्हात वाळवून घ्या, आणि पावडर बनवून घ्या. एका भांड्यात ही पावडर 2 चमचे दूध घाला आणि एकत्र करून घ्या. मग लिंबाच्या फोडी करून घ्या आणि त्यांच्या साहाय्याने हे मिश्रण मानेवर घासा.  

हे मिश्रण 20 मिनिटे तसाच राहूद्या आणि मग कोमट पाण्याने धुवून घ्या. चांगला परिणाम हवा असेल तर आठवड्यातून हा 2-3 वेळा हा उपाय करून घ्यावा. (How do you get rid of dark spots on your neck know everything in marathi )

या पॅकचे फायदे

हा अतिशय गुणकारी असा पॅक आहे, हा पॅक नित्यनेमाने वापरला तर त्वचेला त्याचा फार फायदा होतो. स्किन ग्लो  होऊ लागते शिवाय तुकतुकीत होण्यास खूप मदत होते. त्वचेला टन करण्यास देखील हा पॅक खूप मदत करतो. शिवाय पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, पिंपल्स यावरसुद्धा हा फेसपॅक खूपच फायदेशीर आहे.  

त्यामुळे तुम्हीसुद्धा हा फेसपॅक नक्की वापरून पाहा आणि फरक पडल्यास इतरांना देखील सुचवा. 

(टीप: वरील माहिती सामान्य माहितीच्या आहारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही)