तुम्हीही Oversleeping करताय? पण किती वेळ झोपणं म्हणजे ओव्हरस्लिपिंग? जाणून घ्या

जर तुमची झोपायची पद्धत चुकीची असेल आणि तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

Updated: Apr 22, 2022, 03:49 PM IST
तुम्हीही Oversleeping करताय? पण किती वेळ झोपणं म्हणजे ओव्हरस्लिपिंग? जाणून घ्या  title=

मुंबई : रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची असते. मात्र जर तुमची झोपायची पद्धत चुकीची असेल आणि तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. पण जास्त झोपेचा संबंध अनेक वैद्यकीय समस्यांशी जोडलेला असतो. ज्यामध्ये मधुमेह, हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढतो.

किती काळ झोप म्हणजे ओव्हरस्लिपिंग?

तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचं प्रमाण तुमच्या आयुष्यभरात बदलत असतं. हे तुमचे वय आणि क्रियाकलाप स्तर, तुमचं सामान्य आरोग्य आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, तणाव किंवा आजारपणाच्या काळात, तुम्हाला झोपेची जास्त गरज भासू शकते.

जरी झोपेची गरज वेळोवेळी आणि व्यक्तीनुसार बदलत असली तरी, तज्ज्ञांनी शिफारस केलीये की, प्रौढांनी प्रत्येक रात्री सात ते नऊ तास झोपावं.

ओव्हरस्लिपिंगमुळे का त्रास होतो?

हायपरसोम्नियाने ग्रस्त लोकांसाठी, जास्त झोपणं ही मेडिकल कंडिशन आहे. या स्थितीमुळे, लोकांना दिवसभर जास्त झोपेचा त्रास होतो. झोपेची जवळजवळ सतत गरज असल्यामुळे हायपरसोम्निया असलेल्या अनेक लोकांना चिंता, ऊर्जेची कमतरता आणि स्मरणशक्तीच्या समस्यांची लक्षणं जाणवतात.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया ही एक समस्या आहे ज्यामुळे लोकं झोपेच्या काळात तात्पुरतं श्वास घेणं थांबवतात. यामुळे झोपेची गरजंही वाढू शकते. कारण ही गोष्ट सामान्य झोपेच्या चक्रात व्यत्यय आणते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x