close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पावसाळ्यात आजारापासून वाचायचे असेल, तर या गोष्टींचा आहारात समावेश करा

उन्हाळ्यानंतर पावसाळा सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो. परंतू, पावसाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण देखील असतं. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. 

Updated: Jul 4, 2019, 08:41 PM IST
पावसाळ्यात आजारापासून वाचायचे असेल, तर या गोष्टींचा आहारात समावेश करा

मुंबई : उन्हाळ्यानंतर पावसाळा सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो. परंतू, पावसाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण देखील असतं. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात आपल्या शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. पावसाळ्यामुळे आपल्याला अॅलर्जी, अपचन सारख्या समस्या होतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या शरिराला अशा रोगांपासून वाचवले पाहिजे. पावसाळ्यात काय खाल्ले पाहिजे ते पाहा.

या समस्या होऊ शकतात\

आर्द्रता आणि घाणीमुळे खूप प्रकारचे विकार जन्म घेतात, जसे की डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, वायरल, निमोनिया. जर तुमची प्रतिकार शक्ति कमी आहे, तर तुम्ही लगेच या विकारांशी प्रभावित होऊ शकतात.
  
कारले खा, निरोगी रहा

या ऋतूमध्ये आपण कारले आणि लिंबू, हळद पावडर आणि मेथीचे दाणेसारख्या कडू वस्तू खा. हे तुमचे सगळ्या विकारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
  
उकळलेले सलाद

या ऋतूमध्ये कच्च्या भाज्यांच्या सलादच्या जागेवर शिजवलेले सलादचे सेवन करा, कारण कच्च्या भाज्यामध्ये बॅक्टेरिया आणि वायरस असतो, जो वायरल पसरवण्याचे काम करते. 

तुळस आणि दालचिनी उपायकारक

या ऋतूमध्ये वात असणाऱ्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी तुळस आणि दालचिनी सोबत गरम पाणी पिले पाहिजे. त्यामुळे पोटाच्या विकारांमध्ये सुधारणा होते आणि गुडघ्याचे त्रास कमी होतात.