काळीकुट्ट काखेमुळे Oops Moment ला सामोरे जाताय, या घरगुती उपायांनी उजळेल अंडरआर्म्स

Underarms Cleaning Tips : डार्क अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय करतील मदत. यामुळे अवघ्या एका आठवड्यात जाणवेल बदल 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 27, 2023, 06:47 PM IST
काळीकुट्ट काखेमुळे Oops Moment ला सामोरे जाताय, या घरगुती उपायांनी उजळेल अंडरआर्म्स  title=

Dark Underarms Home Remedies : काख काळी पडणे ही अतिशय सामान्य बाब आहे. शारीरिक स्वच्छतेमध्ये ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण यामुळे अनेकदा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्वचेवर अनेक ठिकाणी पिग्मेंटेशन निर्माण होते. साबणाने सतत घासून त्वचा कालवंडते. यामुळे हा उपाय फायदेशीर ठरतो. अगदी घरगुती उपायांनी करा काळीकुट्ट काख स्वच्छ. अनेकांना वेगवेगळे कपडे घालायला आवडतात. अगदी महिलांना सिव्हलेस ब्लाऊज किंवा ड्रेस घालायला आवडतात. पण काळ्या काखेमुळे ते शक्य होत नाही. किंवा काखेतून सतत दुर्गंधी येत राहते. अशावेळी खालील घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. महत्त्वाचे म्हणजे या घरगुती उपायांनी कोणताही साईड इफेक्ट्स होत नाहीत. 

अंडरआर्म्स स्वच्छ करण्याचे उपाय 

बेकिंग सोडा 

  • एका चमच्यात ४ मोठे चमचे बेकिंग सोडा आणि १ मोठा चमचा गुलाब पाणी घ्या 
  • या पेस्टमध्ये कॉटन बॉल टाका आणि ही पेस्ट अंडरआर्मला लावा 
  • या पेस्टला १० मिनिटांनी स्वच्छ धुवून काढा 

हळद 

  • एका भांड्यात मोठा चमचा हळद घ्या. यामध्ये दही आणि १ चमचा गुलाब पाणी घाला. 
  • या पेस्टला थेट काखेला लावा. काखेतील काळेपणा अगदी उजळून निघेल. 
  • कोमट पाण्याने ही पेस्ट धुवून काढा 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shonali Sabherwal (@soulfoodshonali)

लिंबू रस 

  • एका मोठ्या भांड्यात ४ चमचे दूध घ्या. ज्यामध्ये लिंबाचा दोन तुकडे टाका 
  • हे दोन मिनिटे भिजवत ठेवा 
  • या लिंबाच्या तुकड्याला काखेत लावा अंडरआर्म्स ३ मिनिटांपर्यंत घासा 
  • हा भाग १० मिनिटांपर्यंत तसेच ठेवा. 
  • यानंतर स्वच्छ पाण्याने साफ करा 

बटाट्याचा रस 

  • बटाटा स्वच्छ धवून घ्या 
  • त्यावरील साल काढून टाका 
  • आणि बटाटा छोट्या किसणीने किसा 
  • बटाट्याचा रस काखेला लावा

नारळाचे तेल 

  • नारळ प्रत्येक गोष्टींवर गुणकारी आहे
  • नारळामध्ये व्हिटॅमिन ई आणि पोषणतत्त्वे असतात 
  • नारळाचे तेल दररोज काखेला लावल्यास काळी होत नाही 
  • तेलामुळे काखेतील दुर्गंधी देखील कमी होते.

​कोरफड जेल 

  • कोरफड देखील आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली जाते 
  • कोरफड जेल काखेला लावल्यामुळे काख स्वच्छ होते 
  • कोरफडीमुळे डेड स्किन निघून जाते आणि काख स्वच्छ होते 
  • कोरफडीचे जेल काळ्या भागावर लावा
  • ही जेल तशीच 10 मिनिटे ठेवा 
  • नंतर कोमट पाण्याने धुवून काढा