लेप्टोशी सामना करताना या '5' गोष्टींचं ठेवा भान

लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. 

Updated: Aug 20, 2018, 08:29 AM IST
लेप्टोशी सामना करताना या '5' गोष्टींचं ठेवा भान

मुंबई : लेप्टोस्पायरोसिस हे एक बॅक्टेरियल इंफेक्शन आहे. साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या मूत्र आणि विष्ठा मिश्रीत झाल्यानंतर Leptospira interrogans या बॅक्टेरियाची वाढ होते. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर शरीरातील जखमा, ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरात जातात. क्वचित प्रसंगी हे इंफेक्शन माणसातून पसरू शकते. 

लक्षणं कोणती? 

लॅप्टोची लागण झाल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, स्नायूंचे दुखणे, थंडी वाजणं, त्वचेवर रॅश येणे अशा समस्या वाढतात. लॅप्टोच्या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ श्कते. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो. 

लॅप्टोच्या आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपाय 

पुरेसे पाणी -  

लॅप्टोचा त्रास अतिशय गंभीर असल्यास शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही वेळेस रूग्णांमध्ये काविळीचा त्रासही होतो. अशावेळेस शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणृ आवश्यक आहे. मीठ,साखर आणि पाण्याचे मिश्रण पिणे फायद्याचे ठरते. 

आल्याचा वापर - 

लॅप्टोसोरायसिसचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी आलं अत्यंत फायदेशीर आहे. आल्यातील दाहशामक घटक अवयवांचं नुकसान टाळण्यासाठी मदत करते असे एका प्रयोगातून समोर आलं आहे. आहारात सूप, डाळ यांच्यामध्ये आल्याचा वापर करा.  आले - आरोग्यासाठी हे पाच फायदे

हळद - 

हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे 

कचर्‍याच व्यवस्थापन -  

उंदीर किंवा इतर उपद्रवी प्राणी कचर्‍यांकडे अधिक आकर्षित होतात. त्याअमुळे पावसाळ्याच्या दिवसात घाणीचं साम्राज्य पसरू नये याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

स्विमिंग करताना काळजी घ्या  

पावसाळ्याच्या वर्षासहलींमध्ये किंवा फीटनेस रीजिमचा एक भाग म्हणून स्विमिंग करत असाल तर काळजी घ्या. स्विमिंग करण्यापूर्वी पाणी स्वच्छ आहे की नाही ? याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्वचेवर जखमा असतील तर पावसाळ्यात स्विमिंग करताना काळजी घ्या. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवा - 

पावसाळ्याच्या दिवसात व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शन वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लेप्टोसोबतच इतर आजार दूर ठेवण्यासाठी आहारात व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ,लसूण, प्रो बायोटिक्सचा समावेश वाढवा.