प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेले अन्न बनू शकते विष; डब्बे -कंटेनर खरेदी करताना 'हा' क्रमांक लक्षात ठेवा

Which Plastics Are Safe For Food Storage: प्लास्टिकचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. जर तुम्हाला प्लास्टिकचा वापर करायचा असेलच तर हे तुम्ही वाचाच 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 2, 2024, 07:08 PM IST
प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेले अन्न बनू शकते विष; डब्बे -कंटेनर खरेदी करताना 'हा' क्रमांक लक्षात ठेवा title=
how to identify plastic boxes and containers Are Safe For Food Storage

Which Plastics Are Safe For Food Storage: प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किचनमध्येही हल्ली सर्रास प्लास्टिकच्या डब्यांचा व कंटेनरचा वापर केला जातो. पाण्याच्या बॉटलबरोबरच वस्तु स्टोअर करण्यासाठीदेखील प्लास्टिकचा वापर केला जातो. इतकंच काय तर हल्ली ऑनलाइन फुड ऑर्डर केल्यानंतर ते देखील प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच गरम जेवण पॅक करुन ते डिलिव्हर केले जाते. मात्र, प्लास्टिकचा वापरही आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. त्यामुळं जीवघेणे आजारही होऊ शकतात. प्लास्टिकच्या डब्ब्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी त्यावर नंबरचे कोड दिले जातात. त्याच्या मदतीने तुम्ही प्लास्टिकच्या डब्ब्यांची गुणवत्ता कशी आहे, हे जाणून घेऊ शकता. 

प्लास्टिकच्या डब्ब्यांची गुणवत्ता राखण्यासाठी त्याच्या खाली एक नंबर कोड दिले जातात. त्याच्या मदतीने तुम्ही डब्ब्यांची गुणवत्ता पदार्थ ठेवण्यासाठी योग्य आहे का? या डब्यात असलेले जेवण तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे सर्व आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

या क्रमाकांचा डब्बा घेणे टाळा 

प्रत्येक प्लास्टिकच्या डब्ब्याच्या मागे एक नंबर लिहलेला असतो. खरं तर हा एक रिसायक्लिंग नंबर असतो. म्हणजेच या डब्ब्याच्या गुणवत्तेची माहिती मिळते. जर कोणत्या डब्ब्यांच्या खाली 3,6 किंवा 7 नंबर लिहलेला असतो तेव्हा खूप सावध असणे गरजेचे आहे. कारण  हे डब्बे गरम झाल्यावर हानिकारक घटक त्यात निर्माण होतात. 

वन टाइम यूज असणारे डब्बे

जेवणासाठी प्लास्टिकचे डब्बे खरेदी करण्यापूर्वी नंबरवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.  डब्याच्या मागे त्रिकोणी आकारात 1 नंबरचा आकडा असेल तर त्याचा अर्थ हा डब्बा एकदाच वापरु शकता. एकापेक्षा जास्त वेळा वापर केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. 

रियुजेबल डब्बा कसा ओळखावा?

पावसाळ्यात किंवा बाहेर जाताना प्लास्टिकचे डब्बे वापरणे खूप सोयीचे जाते. अशातच तुम्ही रियुजेबल प्लास्टिक कंटेनर खरेदी करा.  अशावेळी या डब्ब्यांच्या मागे लिहलेले 2,4,5 नंबर असलेले डब्बे घ्या. हे नंबर असलेले प्लास्टिक कंटेनर अनेकवेळा तुम्ही वापरु शकता. त्यामुळं आरोग्यालाही धोका निर्माण होणार नाही. 

फ्रीजर आणि स्टोरेजसाठी डब्बे

जर तुम्ही फ्रीजर किंवा फ्रीजसाठी डब्बे शोधत आहात तर लक्षात घ्या की कंटेवरवर फ्रीजर सेफ लिहलेले असते. त्याव्यतिरिक्त ज्या कंटेनरवर कप आणि चमच्याचे निशाण असेल तर त्याचा अर्थ तुम्ही हे डब्बे जेवण स्टोअर करण्यासाठी करु शकता. 

मायक्रोव्हेव आणि डिशवॉशरसाठी प्लास्टिक

मायक्रोव्हेवसाठी प्लास्टिकचे भांडे किंवा डब्बा खरेदी करण्याची इच्छा असल्यास डब्ब्याच्या मागे तीन लाटा यासारखे निशाण असेल तरच ते डब्बे घ्या. असे डब्बे मायक्रोव्हेव सेफ असतात. तसंच, डब्ब्यांवर पाण्याची अकृती असेल तर डिशवॉशरसाठी सेफ असल्याचे संकेत आहे. तर तुम्ही हे डिशवॉशरसाठी खरेदी करु शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)