Curry Leaves Storage Tips in Marathi: डाळीला तडका देण्यासाठी किंवा भाजीला फोडणी देण्यासाठी कडीपत्त्याचा वापर केला जातो. कडीपत्त्यामुळं जेवणाला चांगली चव येते. तसंच, छान सुगंधदेखील येतो. अलीकडे, सगळ्यांच भाज्यांमध्ये कडीपत्तांची फोडणी देतात. कडीपत्त्याचे आरोग्याचे फायदेही चांगले आहेत. केसांच्या वाढीसाठी तर चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीही कडिपत्ता फायदेशीर आहे. पण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कडीपत्ता काढल्यानंतर २-३ दिवसांतच तो सुकून जातो. अशावेळी अधिक काळासाठी कडिपत्ता टिकवून ठेवणे कठिण होते. काही लोगं कडिपत्ता अधिक काळ टिकावा यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात.मात्र फ्रीजमधील कडीपत्ताही 2-4 दिवसांत काळा पडतो व सुकायला सुरुवात होतो. जास्त दिवस कडिपत्ता फ्रेश कसा ठेवावा, याच्या टिप्स जाणून घेऊया.
काही जणांच्या कुंडीतही कडिपत्त्याचे झाड असते. तर काही जण आठवड्यासाठी बाजारातून एकदाच कडिपत्ता आणून ठेवतात. ज्यांना जेवणात जास्त कडिपत्ता वापरायची सवय आहे त्यांनी कडिपत्ता फ्रेश ठेवण्यासाठी प्लास्टिक किंवा काचेचे भांडे वापरावे. यया डब्यात कडिपत्ता ठेवून दिल्यास जास्त दिवस टिकतो. तुम्हाला हवं असल्यास कंटेनरमध्ये पेपर नॅपकीन ठेवून त्यावर कडिपत्ता ठेवावा.
कडिपत्त्या अधिक काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी व फ्रेश ठेवण्यासाठी देढापासून पाने तोडून ठेवा. देढासह कडिपत्ता ठेवल्याने लवकर खराब होतो. त्यामुळं पाने काढून एका डब्ब्यात स्टोअर करुन ठेवा. त्यानंतर हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्या.
कडिपत्ता उन्हात सुकवून घेतला तरी जास्त काळापर्यंत फ्रेश राहू शकतो. त्यासाठी पहिले देढापासून कडिपत्त्याची पाने तोडून घ्या. त्यानंतर एका कपड्यात ही पाने ठेवून उन्हात सुकवून घ्या. तीन ते चार दिवसांपर्यंत ही पाने सुकवून घेतल्यानंतर एका हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
जेवणात कडिपत्ता वापरल्याने चव तर येतेच पण त्याचबरोबर रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रोज सकाळी कडीपत्ता खाल्ल्यास मॉर्निंग सिकनेस कमी होईल. तसंच, रिकाम्या पोटी कडिपत्ता चावून खाल्ल्यास यकृताचे आरोग्य सुधारते. कडिपत्ता खाल्यास पचनक्रियादेखील सुधारते. बद्धकोष्ठता, अॅसिडीटी आणि अपचन यासारख्या समस्या आराम मिळतो. तुम्ही दही किंवा ताकासोबत कडिपत्ता खाऊ शकता.
कडिपत्त्यामुळं शरिरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळं वजन कमी करण्यास मदत होते. कडिपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.