कुरळ्या केसांची गुंता काढताना वैतागलात; टेन्शन नको, असे मिळवा परफेक्ट Curls

Curly Hair Care Tips In Marathi: अनेक मुली त्यांच्या कोरड्या, कुरळे आणि निस्तेज दिसणाऱ्या कुरळे केसांमुळे त्रासलेल्या असतात. अनेकदा त्यांचे कर्लही व्यवस्थित दिसत नाहीत. अशावेळी काय करावं? जाणून घ्या या टिप्स

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 17, 2023, 01:33 PM IST
कुरळ्या केसांची गुंता काढताना वैतागलात; टेन्शन नको, असे मिळवा परफेक्ट Curls  title=
how to take care of Curly Hair Looks at home in marathi

Curly Hair Care Tips: कुरळे केस (Curly Hair) दिसायला खूप छान दिसतात पण त्यांना सांभाळणे तितकेच कठिण आणि किचकट असते. कुरळ्या केसांना वैतागून अनेकजण स्ट्रेटनिंग करतात पण स्ट्रेटनिंग करताना वापरण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटमुळं केस खराब होतात व केस गळण्याची समस्या अधिक बळावते. त्यामुळं अनेक तरुणी केस सरळ करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अशावेळी कुरळ्या केसांचीच नीट काळजी घेऊन तुम्ही त्यांना उत्तमरित्या हेअरस्टाइल करु शकता. कुरळ्या केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस तुटतात, अशावेळी केसांची काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स जाणून घ्या. (Curly Hair Care In Marathi )

कुरळ्या केसांसाठी बाजारपेठेत खास प्रोडक्ट लाँच करण्यात आले आहे. महागडे प्रोडक्ट न वापरताही तुम्ही निरोगी, चमकदार व परफेक्ट कर्ल्स मिळवू शकतात. मात्र, त्यासाठी तुम्ही योग्य प्रोडक्ट वापरले पाहिजेच. त्यासाठी खास हेअर केअर प्रोडक्ट फॉलो करण्याची गरज आहे. जर, तुमचे केस ड्राय आणि विस्कटलेले दिसत असतील तर आत्ताच तुमचे हेअर केअर प्रोडक्ट बदला आणि केसांकडे व्यवस्थित लक्ष द्या. 

शॅम्पू कसा निवडाल 

कुरळे केसांची व्यक्ती ही प्रभावी दिसते. तुम्ही कुरळ्या केसांतही फॅशनेबल दिसू शकतात. त्यामुळं तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या कर्ल्सची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी योग्य शॅम्पू निवडा जेणेकरुन तुमचे केस रुक्ष होणार नाहीत. आठवड्यात दोन ते तीन दिवस तुम्ही केस धुवा. जेव्हा तुम्ही केस धुवत असता तेव्हा मुळांपर्यंत शॅम्पू करा. जेणेकरुन डोक्यावर साचलेला मळ आणि कोंडा निघून जाईल. कुरळे केस मुलायम ठेवण्यासाठी मॉइस्चर, सल्फेट फ्री, शिया बटर आणि ग्लिसरीनसारखे घटक असतील असा शॅम्पू निवडा. 

केसांना कंडिशनर लावा

केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. कंडिशनर कुरळ्या केसांना मुलायम ठेवतो तसंच, केसांमध्ये गुंता होण्यापासून वाचवते. तसंच, परफेक्ट कर्ल्स तयार होतात. पण कंडिशनर लावताना एक काळजी घ्या की, केसांच्या मुळांना कंडिशनर लावू नका फक्त वरच्या भागावरच लावा. 

हेअर मास्क लावा

15 दिवसांत एकदा हेअर मास्क लावा जेणेकरुन तुमचे कर्ल्स बाउंन्स होतील. हेअर मास्कमुळं केस रुक्ष होत नाहीत. तसंच, कर्ल्स वाढतात व केसांना मॉइश्चुरायजर मिळते. हेअर मास्क कर्ल्सला हायड्रेटेड, पोषण मिळवण्यास मदत करते. 

जेल लावा

कुरळे केस धुतल्यानंतर व कंडिशनर लावल्यानंतर केसांना जेल लावून घ्या. जेलमुळं केसांना पकड मिळण्यास मदत मिळते तसंच ते कमी गळतात. त्यामुळं केसांना हायड्रेटड मिळेल असंच जेल किंवा सीरम निवडा. जेलमध्ये ग्लिसरीन, नारळाचे तेल, अॅलोवेरा सारखे घटक असतात. जेलमुळं केसांना चमक येते आणि ते रेशमी दिसतात. 

केसांना तेल वाला

कुरळ्या केसांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी तेल गरम करून त्याने मालिश करायला हवं. यासाठी तुम्ही बदाम तेल अथवा नारळाचं तेल गरम करून तुमच्या केसांना लावा.