उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी... यासाठी वापरा हा घरगुती उपाय

बदलत्या वातावरणानुसार आपल्या त्वचेची काळजीची पद्धत आणि प्रोडक्टमध्ये बदल करणे जरूरीचे आहे.

Updated: Apr 17, 2021, 05:52 PM IST
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी... यासाठी वापरा हा घरगुती उपाय

मुंबई : थंडीचा महिना नुकताच संपला आहे आणि एप्रिल महिन्यांची सुरूवात झाली आहे. आता उन्हाळादेखील वाढत चालला आहे. बदलत्या वातावरणानुसार आपल्या त्वचेची काळजीची पद्धत आणि प्रोडक्टमध्ये बदल करणे जरूरीचे आहे. त्वचेची काळजी घेतली तर ती तजेलदार राहते पण तेच दुर्लक्ष केले तर ते हानिकारक ठरू शकते. त्वचा  चमकदार आणि कोमल राहण्यासाठी लोक वेग-वेगळ्या ब्युटी प्रोडक्ट वापरतात. त्यात केमिकल असते त्या केमिकलचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला ते प्रोडक्ट सूट करेल असं नाही. तेव्हा घरगुती उपायाचा वापर करणं हे कधीही चांगलं असतं. चमकदार त्वचेसाठी जायफळचा वापर करणे चांगले असते. कसं ते जाणून घेऊ.

त्वचेवर चमक आणण्यासाठी जायफळ हे उपयुक्त ठरते. जायफळामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतो जो त्वचेला डॅमेज होण्यापासून वाचवतो.

कोरड्या त्वचेचं कारण हे डेड स्किनदेखील असू शकते. यामुळे त्वचेवर काळेपणा येतो यापासून वाचण्यासाठी उपाय करणे गरजेचं आहे. जायफळमुळे चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते. जायफळाचा स्क्रब डेड स्किन घालवण्यासाठी वापर केला जातो.

जायफळाचा फेस पॅक तयार करण्यासाठी जायफळ पावडर, दही आणि मध या गोष्टी लागतात. या तिन्ही गोष्टीचे मिश्रण  तयार करून ते पुर्ण चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनीटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

घरच्या घरी हा स्क्रब तयार करण्यासाठी 1 चमचा जायफऴ, 1 चमचा मध, चिमुटभर बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि लंवग तेल लागेल. आता एका वाटीमध्ये मध, बेकिंग सोडा आणि लंवग तेल घ्यावे. यानंतर जायफळ पावडर आणि लिंबाचा रस वाटीमध्ये घ्या.

या सर्व गोष्टींना नीट मिक्स करा. आता या पेस्टला चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटानंतर चेहरा धुवून टाका.