..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व

 मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे

Updated: May 29, 2018, 01:08 PM IST
..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व title=

मुंबई: चुंबन (किस) हा नात्यातील एक असा प्रकार आहे. जो दोन व्यक्तिंना एकत्र आणतो. महत्त्वाचे म्हणजे तो लोकांना केवळ शरीराने एकत्र आणत नाही तर, मनानेही आणतो. मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे. तुम्हाला जर नात्यातला ओलावा अधिक घट्ट करायचा असेल तर, पार्टनरला रोज किमान एकदोन वेळा तरी किस करा. पार्टनरला नियमीत किस का करावा याची ही आहेत ५ महत्त्वाची कारणे... 

प्रेमाची पोचपावती

केवळ पार्टनरवर प्रेम असून, चालत नाही. ते व्यक्तही करावे लागते. प्रेम व्यक्त करण्याचा अत्यंत साधा आणि पटकन अंमलात आणता येणारा घटक म्हणजे किस. तुमचा एक हलकासा किसही पार्टनरला मोठा आनंद मिळवून देऊ शकतो.

नात्यातील जवळीक

किस करण्यामुळे नात्यातील जवळीक अधीक वाढते. जर, तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज असेल तर, त्याला मिठीत घेऊन छानसा किस करा. नात्यातील तणाव काहीसा दूर होण्यास मदत होईल.

भावना व्यक्त करा

किस केल्याने केवळ नातेसंबंध घट्ट होतात असे नाही तर, तुमच्या मनातील भावनाही व्यक्त होते. तुम्ही कोणत्या ठिकाणी (भौगोलिक स्थान. अवयव नव्हे..) किस केला त्यावरून तुमच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज पार्टनरला येतो. ज्यामुळे तुमच्या मनातील भावना त्याला न सांगताही कळते.

रोमान्सची हटके स्टाईलच

अनेकांना असे वाटते की, रोमान्स म्हणजे केवळ शरीरसंबंध. पण, हे खरे नाही. जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर कंटाळला असाल तर, एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने किस करा. तुम्हाला हा हटके रोमान्स नवी अनुभूती देऊन जाईल.

तणाव कमी होईल

या दुनियेत तणावात नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर तणावात असाल तर, एकमेकांशी प्रेमाणे बोला. हलकासा किसही करा. तुमच्या मनावरचा ताण कमी होताना जाणवेल.