Mpox Virus : एमपॉक्स म्हणजे मंकीपॉक्स व्हायरसमुळे होणारा आजार आहे. हा एक व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार असून संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर याची लागण होते. एमपॉक्स हा नवा आजार नाही तर याचा पहिला रुग्ण 1958 साली डेनमार्क येथे आढळला.
आता पुन्हा एकदा या व्हायरसने महामारीचे रुप धारण केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून कांगोमधून एमपॉक्सचे जवळपास 16700 रुग्णांची प्रकरणे समोर आली आहे. या व्हायरसने आतापर्यंत 570 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 115 देशांमध्ये एमपॉक्सचे रुग्ण असून यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात 30 रुग्ण सापडले आहेत.
शरीरावर पाण्याने भरलेल्या फोड्या
ताप
डोकेदुखी
स्नायूदुखी
पाठ दुखी
थकवा, अशक्तपणा
घशाला सूज येणे
मंकीपॉक्स इंफेक्शनवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. ज्यामुळे या आजाराला कंट्रोल करणे कठीण आहे. मंकीपॉक्सच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येच उपाय सुरु केल्यास त्याला आटोक्यात आणणे सोयीचे होऊ शकते.
WHO च्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सपासून बचाव करण्यासाठी जनावरांपासून असुरक्षित पद्धतीने संपर्कात येणे टाळळे पाहिजे. तसेच आजारी आणि मेलेल्या जनावरांना स्पर्श करताना किंवा त्याचे मटण खाताना सावध राहा. तसेच मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांपासून दूर राहा. एवढंच नव्हे तर संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवताना प्रोटेक्शन वापरा.
मंकीपॉक्स एक संक्रमीत आजार आहे. महत्त्वाचं म्हणजे 21 दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. या आजाराचा प्रभाव 14 ते 21 दिवस राहतो. मंकी पॉक्सच्या आजारांवर कोणतीही लस नाही.
या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी व्यक्तीने लक्षणांना ओळखणे आवश्यक आहे.
संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा. कोरोना काळात जसा स्वतःचा बचाव केला त्यापद्धतीने स्वच्छता राखणे, काळजी घेणे आवश्यक आङे.
शारीरिक संबंधांपासून दूर राहा. यापासून बचाव करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)