Covid 19 Study on Lung: करोनामुळं आर्थिक आणि शारिरीक असे दोन्हीपद्धतीने भारतीयांना नुकसान सोसावे लागले आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, करोना महामारीमुळं भारतीयांची फुफ्फुस खूप कमकुवत झाली आहेत. क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने केलेल्या एका अहवालानुसार, कोविड-19 मुळं फुफ्फुस कमजोर झाली आहेत. युरोपीय आणि चीन नागरिकांच्या तुलनेने भारतीयांना अधिक नुकसान सोसावं लागलं आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या नोंदीनुसार, काही जण वर्षभरातच बरे झाले आहेत तर काहींना आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागणार आहे.
या संशोधनासाठी 207 लोकांच्या फुफ्फुसांचे निरीक्षण करण्यात आले. ज्या रुग्णांना सौम्य व तीव्र स्वरुप किंवा गंभीर स्वरुपाचा कोविड झाला होता. त्यांच्या फुफ्फुसाचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी त्यांना सहा मिनिटांचा वॉक टेस्ट, ब्लड टेस्ट आणि बॉडी चेकअप करण्यात आले.
सर्वात जास्त संवेदनशील फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली. याला गॅस ट्रान्सफर (DLCO) असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन खेचण्याची क्षमता मोजली जाते. या तपासणीत आढळून आले की, 44 टक्के लोकांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती खूपच चिंताजनक आहे. 35 टक्के लोकांच्या फुफ्फुसांना कमी नुकसान पोहोचले आहे. 35 टक्के लोकांना फुफ्फुस आंकुचित पावले आहेत. म्हणजेच ऑक्सीजन घेताना फुफ्फुस पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. 8.3 टक्के लोकांना श्वास घेताना त्रास होण्याचे निरीक्षण आढळले आहे.
या अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सीएमएस वेल्लोरच्या पल्मोनरी विभागाच्या डॉ. डीजे क्रिस्टोफर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रुग्णांमध्ये चीन व युरोपीयन रुग्ण्यांच्या तुलनेत फफ्फुसांचे अधिक नुकसान झाले आहे. त्याव्यतिरिक्त चीन आणि युरोपातील लोकांच्या तुलनेत भारतीयांना मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रासही अधिक जाणवतो.
नैनवती रुग्णालयाचे पल्मोनोलॉजीचे वरिष्ठ डॉक्टर सलील बेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या काही रुग्णांमध्ये संसर्ग झाल्यानंतर 8-10 दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाले. ऑक्सीजन सपोर्ट आणि स्टेरॉईडचे उपचार घेतल्यानंतर संसर्ग जरी कमी झाला असला तरी फुफ्फुसात फायब्रोसिस निर्माण झाले. त्यानंतर 95 टक्के लोकांचे फुफ्फुसाचे आजार हळूहळू कमी झाले. मात्र अजूनही 4-5 टक्के रुग्णांना दीर्घकाळापासून श्वास घेण्याची समस्या निर्माण होत आहे.