मोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण

Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे. 

Updated: Sep 1, 2022, 07:46 AM IST
मोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण  title=

नवी दिल्ली : Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे. आज केंद्र सरकारकडून ही लस अधिकृतरित्या बाजारात येणार आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी हे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. (India to launch indigenous vaccine against cervical cancer)

गर्भाशायचा कॅन्सर ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. देशातील महिलांमध्ये आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर असून याचा मृत्यूदरही अधिक आहे. या लशीचे लॉन्चिंग केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.  15 ते 44 वयोगटातील महिलांना या कॅन्सरचा जास्त धोका असतो. गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी ही स्वदेशी लस रामबाण उपाय ठरणार आहे.  

गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगावरील स्वदेशी लस भारताला गुरुवारी मिळणार आहे. या लसीमुळे रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे. ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे 1 सप्टेंबर 2022 रोजी लान्च केली जाईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) 12 जुलै रोजी लसीसाठी बाजार अधिकृतता मिळाली होती.   

- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध ही भारतातील पहिली क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (qHPV) आहे.

- ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे तयार केली जाईल.

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रथमच भारतीय HPV लस उपलब्ध होणार आहे, जी परवडणारी आणि उपलब्ध दोन्ही आहे.  

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC-WHO) नुसार, भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुमारे 1.23 प्रकरणे नोंदवली जातात आणि जवळपास 67,000 महिलांचा मृत्यू होत असल्याचे पुढे आलेय.

- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या अहवालात भारत जगात 5 व्या स्थानावर आहे.

- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे.

- आकडेवारीनुसार, 15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे. 

- सहसा त्याची लक्षणे निश्चित करणे कठीण असते.