Belly fat कमी करण्यासाठी घरगुती उपाय; फक्त करावं लागेल 'हे' सोपं काम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Sep 1, 2022, 06:39 AM IST
Belly fat कमी करण्यासाठी घरगुती उपाय; फक्त करावं लागेल 'हे' सोपं काम title=

मुंबई : पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. त्यानंतरही त्यांना फारसा परिणाम दिसून येत नाही. पोटाची चरबी खूप वाढणं हे आरोग्यासाठीही घातक ठरू शकतं. पण, काही घरगुती उपायांनी ते कमी करता येऊ शकतं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रिकाम्या पोटी लिंबू-मध पाणी

सकाळी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून त्यात मध मिसळून प्या. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर सकाळी रिकाम्या पोटी प्या. लिंबूमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. तसंच, लिंबूमध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं, ते फॅट कमी करण्यासाठी मदत करतं.

आवळ्याचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या

आवळा बारीक करून एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून सकाळी प्या. त्याचप्रमाणे आवळा सरबत किंवा आधी तयार केलेला आवळ्याचा रस देखील पाण्यात मिसळून सेवन करू शकता. आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचा घटक असतो, जो शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. 

बडीशेप फायदेशीर

बडीशेप, जिरं, ओव आणि मेथी रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पाण्यात उकळून ते पाणी प्या. बडीशेप अपचन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे फायदेशीर मानलं जातं. तसंच पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. शिवाय याच्या सेवनामुळे अयोग्य खाण्याची सवय देखील मोडू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)