नवी दिल्ली : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी अनेक औषध समोर येत आहेत. वैज्ञानिक तसेच औद्योगिक अनुसंधान परिषदेने कोविड १९ च्या उपचारासाठी फेविपिराविर लॉंच करण्यासाठी कंपनी सिपला पूर्णपण सज्ज आहे.
जपानच्या फुजी फार्मामध्ये विकसित फेविपिराविरच्या क्लिनिक ट्रायल दरम्यान याचा परिणाम चांगला आलाय. हलक्या आणि मध्यम लक्षणांच्या कोविड १९ च्या रुग्णांमध्ये विशेषत: याचा चांगला परिणाम दिसला. CSIR ने स्थानिक स्तरावर उपलब्ध रसायनांचा उपयोग करुन हे औषध बनवले असून सर्वात स्वस्त प्रक्रिया शोधून ती सिपलाला दिली आहे.
सिपलाने हे बनवण्याचे काम सुरु केले असून भारताच्या औषधी महानियंत्रक (DCGI) मध्ये औषध आणि भारतीय बाजारात आणण्याची परवानगी मागितली आहे. महानियंत्रकने देशाच्या फेविपिराविर आपत्कालिन स्थितीमध्ये वापरण्यास परवानगी दिली आहे. सिपला आता कोविड १९ शी लढण्यास रुग्णांना मदत करत आहे.