दूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे

पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...

Updated: Feb 27, 2020, 09:04 AM IST
दूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : दूध हा भारतीय खाण्या-पिण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण जर दूधाने कॅन्सर होण्याचा धोका आहे? असं म्हटलं तर...धक्काच बसला ना...पण अमेरिकेतील संशोधकांनी आपल्या शोधात डेअरी दूध पिण्यामुळे कॅन्सरचा धोका असल्याची बाब समोर आणली आहे. डेअरी दूधामुळे, महिलांना सर्वाधिक कॅन्सरचा धोका असल्याचा दावा संशोधकांनी आपल्या संशोधनात केला आहे. डेअरी दूधात गाय, म्हैस आणि बकरीच्या दूधाचा समावेश असतो. 

महिल्यांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका  (Breast Cancer)

अमेरिकेतील लोमा लिंडा विद्यापिठातील (Loma Linda University) आरोग्य विषयाशी संबंधित असलेले डॉक्टर गॅरी ई. फ्रेजर यांनी सांगितलं की, डेअरी दूध पिण्यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचे ठाम पुरावे मिळाले आहेत. दररोज एक कप डेअरी दूध पिण्याऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ५० टक्के असल्याचं संशोधकांचं  म्हणण आहे. तर दररोज दोन ते तीन कप डेअरी दूध पिणाऱ्या महिलांमध्ये हा धोका वाढून तो ७० ते ८० टक्के होत असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाच्या अभ्यासासाठी, उत्तर अमेरिकेतील ५३,००० महिलांच्या आहाराचं मूल्यांकन केलं गेलं. या सर्व महिला सुरुवातीला कॅन्सरमुक्त होत्या. महिलांवर आठ वर्षांपर्यंत संशोधन केलं गेलं.

दरम्यान, महिलांचं वातावरण, कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक चाचणी यासह स्तनाच्या कर्करोगाच्या इतर बाबींचा या संशोधनात विचार केला गेला नाही. हा अभ्यास डेटाबेसच्या माध्यमातून प्रश्नावली आणि विश्लेषणाच्या माध्यमातून केला गेला आहे.

अभ्यासाअंती, १०५७ महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याची प्रकरणं समोर आली. डॉक्टर फ्रेजर यांच्या मते, डेअरी फूड आणि त्यातही डेअरी दूध अधिक धोकादायक आहे. डेअरी दूधाऐवजी सोया मिल्कचा वापर करुन, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकत असल्याचं डॉक्टर फ्रेजर यांनी सांगितलं आहे.