कोरोना व्हायरस आणि सरकारचा भारतीयांना सल्ला

 कोरोना अर्थात कोविड-19 COVID-19 (Corona virus) विषयी सरकारने भारतीयांना सल्ला दिला आहे की

Updated: Feb 26, 2020, 10:44 PM IST
कोरोना व्हायरस आणि सरकारचा भारतीयांना सल्ला title=

मुंबई : कोरोना अर्थात कोविड-19 COVID-19 (Corona virus) विषयी सरकारने भारतीयांना सल्ला दिला आहे की, आवश्यक नसेल तर कोरिया आणि ईराण तसेच इटलीचा प्रवास टाळा. कोरिया (Republic of Korea), ईराण (Iran) आणि इटली ( Italy) हून येणारे लोक अथवा 10 फेब्रुवारी, 2020 पासून आतापर्यंत जे या संबंधित देशातून प्रवास करून परतत आहेत, या लोकांना 14 दिवसासाठी वेगळ्या वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.

कोणत्याही तांत्रिक प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास संबंधित व्यक्तीला आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 24 तास सुरू असणारी एक हेल्पलाईन देण्यात आली आहे. +91-11-23978046 या हेल्पलाईनवर संपर्क करू शकतात, अथवा  +91-11-23978046 तसेच ncov2019@gmail.com वर देखील मेल करू शकतात.

सतत पावलं उचलली जात आहेत...

चीनमध्ये कोरोनावायरस (China Corona Virus) मुळे पसरणारा धोकादायक संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी भारताने अनेक आवश्यक पावलं उचलली आहेत.

NCoVशी संबंधित माहितीसाठी NCDC कॉल सेंटर सुरू करण्यात आलं आहे. तसेच कोरोना व्हायरसशी संबंधित महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने @MoHFW_INDIA ने माहिती देण्यास सुरूवात केली आहे. 

NIV पुण्याची लॅबनंतर आणखी 4 ठिकाणी व्हायरस टेस्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. काही दिवसातच 10 ठिकाणी व्हायरस टेस्टची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.