जास्त प्रमाणात चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक? जाणून घ्या काय आहे सत्य!

चहामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त आढळतं. 

Updated: Jun 4, 2022, 02:23 PM IST
जास्त प्रमाणात चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक? जाणून घ्या काय आहे सत्य! title=

मुंबई : चहाची चाहत अनेक लोकांना असते. कदाचित तुम्हालाही चहा प्रचंड प्रमाणात आवडत असेल. मात्र तुम्हाला माहितीये का? एक किंवा दोन कपपेक्षा जास्त चहा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. म्हणजेच जे लोक एका दिवसात 4 कप पेक्षा जास्त पितात त्यांना अनेक समस्या भेडसावू शकतात. 

अतिप्रमाणात चहा प्यायल्यास सुरुवातीला तुमचं पोट दुखू शकतं. शिवाय त्याचे वाईट तुमच्या आतड्यांवरही होतात. एवढंच नाही तर तुम्हाला झोप न येण्याची समस्याही होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया, अधिक चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

चहामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त आढळतं. हे शरीरात गेल्याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणजेच अशा परिस्थितीत तुम्हाला ही सवय हळूहळू बदलावी लागेल.

आतड्यांसाठी योग्य नाही अतिप्रमाणात चहा

जास्त चहा पिणं आतड्यांसाठी हानिकारक असू शकतं. मुळात चहामुळे तुमच्या आतड्यांचं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे अन्न पचण्यात समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत छातीचा त्रास आणखी वाढू शकतो. यामध्ये छातीत जळजळ होण्याचीही तक्रार असू शकते.

झोप येण्याची समस्या

जास्त चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते. अशा स्थितीत पुरेशी झोप न मिळाल्यास सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी अतिप्रमाणात चहा पिण्याची सवय सोडावी लागेल. एका दिवसात 2 कप चहा पुरेसा असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आलाय.