Covid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?

लस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करावी का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.

Updated: Jun 5, 2021, 02:13 PM IST
Covid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?

मुंबई : कोरोनाची लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतर देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी कोरोना चाचणी करावी का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. 

अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशन नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटल्याप्रमाणे, पूर्णपणे वॅक्सिनेट झालेली व्यक्ती जर आजारी रूग्णाच्या संपर्कात आली तर त्याने क्वारंटाईन होण्याची गरज नाहीये. जर ताप, खोकला आणि थकल्यासारखे काही लक्षणं दिसून आली तर कोरोना चाचणी केली पाहिजे.

समाचार एजेंसी एसोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, सीडीसीने दिलेल्या नव्या निर्देशांमध्ये नुकत्याच झालेल्या काही अभ्यासांवरून सांगण्यात आलं आहे की, पूर्णपणे वॅक्सिनेट झालेल्या लोकांमध्ये गंभीर स्वरूपाचं संक्रमण होण्याचा धोका फार कमी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली तर तुमच्याद्वारे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यताही कमी आहे. 

सीडीसीच्या म्हणण्याप्रमाणे, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रूटीन स्क्रिनिंगपासूनही वेगळं केलं जाऊ शकतं. तर 13 मे रोजी सीडीसीने केलेल्या घोषणेमध्ये सांगण्यात आलं होतं की, कार्यक्रमांमध्ये विनामास्क आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन केल्याशिवाय वॅक्सिनेट झालेले नागरिक सहभागी होऊ शकतात.