Jaggery tea : गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या सत्य

पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ चांगलं असं म्हणून आपण चहामध्ये गुळाचा वापर करतो.

Updated: Aug 3, 2022, 09:57 PM IST
Jaggery tea : गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या सत्य title=

मुंबई : पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ चांगलं हे खरं आहे, पण चहामध्ये साखरेच्या जागी गुळ हे चांगले कॉम्बिनेशन योग्य नाही. दोन्ही एकत्र सेवन करणं शरीरासाठी हानिकारक आहे. आयुर्वेदात दोघांनाही सर्वात वाईट फूड कॉम्बिनेशनच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय.

गुळाच्या चहाचे तोटे

आयुर्वेदात गुळ ही औषधी गुणधर्मांची खाण मानली जाते, पण दुधात मिसळलं की त्याचे सर्व गुणधर्म नष्ट होतात. दूध आणि गुळाची चव वेगळी असते. यामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि अपचन, गॅस, अॅसिडीटी सारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

चहामध्ये गुळाऐवजी साखरेचा वापर करा

गुळामध्ये जीवनसत्त्वं, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. पण ते चहामध्ये मिसळून पिऊ नये. चहामध्ये तुम्ही साखरेऐवजी शुगर कँडी वापरू शकता. शुगर कँडी दुधासारखी थंड असते, त्यामुळे याचा फायदा जास्त होऊ शकतो.

रिकाम्या पोटी गुळाचं सेवन फायदेशीर

ब्लड शुगरची समस्या असणाऱ्यांनी गूळ खाण्याची गरज नाही. पण ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी गूळ खावा. गुळामुळे तुमचं हिमोग्लोबिनचं लेवल वाढतं. त्याच वेळी, चयापचय दर मजबूत करण्यासाठी, तुम्ही रिकाम्या पोटी पाण्यासोबत गुळाचे सेवन करू शकता. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने फायदा होतो. हे शरीर डिटॉक्स करण्याचं काम करतं.