- कारल्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. दररोज एक महिना कारल्याच्या सेवनाने कफाचा जूना त्रासही दूर होण्यास मदत होते. खोकल्याच्या त्रासावरही कारले गुणकारी ठरते.
- मधुमेहासाठी कारले वरदान ठरते. कारल्याच्या रसात सम प्रमाणात गाजराचा रस घालून प्या. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. सकाळच्या वेळेस कारल्याचा रस घेणे फायदेशीर ठरेते.
- स्टोनची समस्या असल्यास कारल्याचा रस पिणे किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते. २० ग्रॅम कारल्याच्या रसात मध आणि थोडेसे हिंग घालून प्यायल्याने स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते.
- खरुज, सोरॉसिस यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस घालून प्यायल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात.
- कारल्याच्या रसामध्ये थोडेसे पाणी आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करा. यकृतासंबंधिचे काही आजार असल्यास त्यावर कारले गुणकारी ठरेल. अर्धा कप पाण्यात एक दोन चमचे कारऱ्याचा रस घालून प्यायल्यास डायरियावर फायदा होतो.
- कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून रोज सकाळी दोन महिन्यांपर्यंत या रसाचे सेवन केल्यास शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स दूर होतात आणि यामुळे पाचनक्रिया सुधारते आणि सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.