सावधान! मुलांना स्विमिंग शिकवण्याआधी घ्या ही काळजी

अनेक तज्ञ स्विमिंगला एका खेळाव्यतिरिक्त व्यायामाचा एक उत्तम पर्याय मानतात.

Updated: Apr 11, 2019, 04:19 PM IST
सावधान! मुलांना स्विमिंग शिकवण्याआधी घ्या ही काळजी  title=

मुंबई : पालकांमध्ये आपल्या मुलांना स्विमिंग शिकवण्याची क्रेझ काही वर्षांपासून अनेक वाढले आहे. काही पालक आपल्या मुलांना स्विमिंग शिकवण्याच्या बहाण्याने स्वत:ही स्विमिंग शिकतात. अनेक तज्ञ स्विमिंगला एका खेळाव्यतिरिक्त व्यायामाचा एक उत्तम पर्याय मानतात. परंतु स्विमिंग योग्यप्रकारे न केल्यास आरोग्यासाठी नुकसानकारकही ठरू शकते.  इन्द्रप्रस्थ अपोलो रूग्णालयाचे डिपार्टमेन्ट ऑफ इंटरनल मेडिसिन सीनियर कन्सलटेन्ट डॉ राकेश गुप्ता यांनी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. 

आरोग्य तपासणी 

मुलांना स्विमिंगच्या क्लासला पाठवण्याआधी डॉक्टरांकडून मुलाची तपासणी करून घ्या. त्वचेचे संक्रमण, डोळे, नाक, कान, घशाची तपासणी करून घ्या. स्विमिंग पूलच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सर्व इंद्रियांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. 

जर मुलाचे वजन अधिक जास्त किंवा अधिक कमी असल्यास अशा मुलांना डॉक्टरांकडून काही सल्ले देण्यात येतात. त्यामुळे मुलांना स्विमिंगला टाकण्याआधी डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.

स्विमिंग पूलची स्वच्छता 

स्विमिंग पूलच्या स्वच्छतेवर लक्ष देणे गरजेचे असते. दररोज पूलमध्ये अनेक लोक येत असतात. अशावेळी एखाद्याला त्वचारोग किंवा अन्य काही रोग असल्याचा त्याचा आपल्या मुलालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे रोज स्विमिंग पूलचे पाणी बदलले जाते का, स्वच्छ केले जाते का याची चौकशी करा. अनेकदा स्विमिंग पूल खुल्या जागी असतात. त्यावर छप्पर नसल्यास स्विमिंग पूलमध्ये पडणाऱ्या धूळ, पावसाचे पाणी तसेच इतर कचऱ्यामुळे संक्रमण होण्याचा धोका असतो.

लाइफ गार्ड 

सर्व स्विमिंग पूलमध्ये लाईफगार्ड असणे गरजेचे आहे. काही वेळा एखाद्या साधारण पोहणाऱ्या व्यक्तीला लाईफ गार्ड म्हणून उभे केले जाते. अशा व्यक्तीकडे आपत्कालीन परिस्थितीत वाचवण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण नसते. ज्यावेळी स्विमिंगसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते, त्यावेळी अधिक लाईफ गार्ड असणे गरजेचे आहे.

प्रथमोपचार सुविधा

सरकारी नियमांनुसार जलतरण तलावात प्रथमोपचार सुविधा आणि इतर सर्व प्राथमिक सुविधा असाव्या. या सुविधा स्विमिंग पूलच्या जवळ असाव्यात. आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीला प्रथम प्राथमिक मदत कक्षात नेणे आवश्यक आहे आणि आवश्यकतेनुसार प्राथमिक मदत दिली गेली पाहिजे.

प्रशिक्षण आणि प्रशिक्षक

पाण्यात उडी मागण्याआधी मुलांना अनुभवी कोचद्वारा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना पोहण्याचे शिकवण्यावेळी सुरक्षा उपकरणांचा वापर होणे गरजेचे आहे. ग्लासेस, फ्लोटर्स, इयर प्लग, कॅप इत्यादींचा वापर करणे गरजेचे आहे. फ्लोटरमध्ये छोटासाही होल असल्यास त्याची वेळीच दुरूस्ती केली गेली पाहिजे. फ्लोटर्स योग्य नसल्यास पाण्यात मुलांचे संतुलन बिघडण्याचा धोका असतो. 

डीहायड्रेशन

पाण्यात पोहत असतानाही शरीरात डीहाइड्रेशन होत असते. जास्त घाम येतो. त्यामुळे पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे.