जे लोणी तुम्ही आरोग्यवर्धक समजून खाता ते लोणी बोगस तर नाहीये ना?

असली आणि नकली लोण्यातला फरक घरच्या घरीही सहज ओळखता येतो.  

Updated: Feb 5, 2022, 09:32 PM IST
जे लोणी तुम्ही आरोग्यवर्धक समजून खाता ते लोणी बोगस तर नाहीये ना?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  लोणी शरीरासाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडनं लोण्याची विक्री केली जाते. पण तुम्हाला माहितीये का? हेच लोणी तुमच्या जिवावरही बेतू शकतं. कारण बाजारात नकली लोण्याची सर्रास विक्री सुरूंय. बनावट आणि आरोग्यवर्धक लोणीमुळे अनेक आजारही होण्याची भिती नाकारता येत नाही. (know how to check pure and adulterated butter)
 
लोणी अर्थात बटर म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. स्वादिष्ट जेवणासाठी गृहिणी हमाखास लोण्याचा उपयोग करतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड आणि बटर. पण जरा थांबा. हेच लोणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. एका माहितीनुसार बनावट लोण्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे हानीकारक लोणी खाल्ल्यानं कॅन्सर, डायबिटीजसारखे आजार बळावतायेत.

अशा नकली लोण्यात जास्त प्रमाणात फॅट असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे येऊन ह्दयविकारचा धोका वाढतो. याशिवाय रूग्णाला डायबिटीजचाही सामना करावा लागू शकतो. लोण्याचं अतिसेवन केल्यास शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं. चरबी वाढल्यानं इतरही व्याधी वाढू शकतात.

त्यामुळे नकली लोण्यापासून प्रत्येकानं सावध राहायला हवं. असली आणि नकली लोण्यातला फरक घरच्या घरीही सहज ओळखता येतो.

कसं ओळखाल नकली लोणी?

पाण्यानं भरलेले दोन काचेचे बाऊल घ्या. दोन्ही बाऊलमध्ये अर्धा-अर्धा चमचा लोणी टाका. त्यानंतर दोन्ही बाऊलमध्ये तीन ड्रॉप आयोडीन सोल्यूशन टाका. शुद्ध लोण्याचा रंग बदलणार नाही. मात्र बनावट आणि भेसळयुक्त लोण्याचा रंग निळसर होईल. 

त्यामुळे आपलं आरोग्य बिघडू नये असं वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. नकली लोण्याला जास्त मस्का लावू नका. नाहीतर जीवावर बेतेल.