हेल्दी आणि टेस्टी; काय आहेत पंतप्रधानांचे आवडीचे पदार्थ?

'हे' आहेत पंतप्रधानाचे आवडीचे पदार्थ...

Updated: Sep 22, 2019, 02:02 PM IST
हेल्दी आणि टेस्टी; काय आहेत पंतप्रधानांचे आवडीचे पदार्थ? title=

नवी दिल्ली : कामाचा ताण, थकवा अनेकांना येतो. आपल्याला सर्वांना आठवड्यातून एकदा तरी आराम हवा असतो. पण, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकही दिवस सुट्टी न घेता संपूर्ण आठवडा काम करतात. हे शक्य आहे कारण, पंतप्रधानांनी त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला आहे ज्यात चवीसह निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचीही काळजी घेतली जाते. झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, 'हे' आहेत पंतप्रधानाचे आवडीचे पदार्थ...

खिचडी -

खिचडी असं खाणं जे अगदी सोप्प्या पद्धतीने बनवलं जातं आणि ते सहजपणे पचतंही. ज्यावेळी काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यावेळी अनेकजण खिचडी खाणं पसंद करतात. पण पंतप्रधानांना मात्र खिचडी रोज खाणं पसंद आहे. खिचडीसोबत दही खाणंही त्यांना आवडतं असल्याची माहिती आहे.

गुजराती ढोकला - 

गुजराती ढोकला अतिशय हलका नाश्ता आहे. हा ढोकला लवकर पचतोही. पंतप्रधान ढोकळा खाणंही पसंत करतात.

खांडवी -

बेसन आणि ताकापासून तयार केलेला खांडकी हा पदार्थ अतिशय चविष्ठ असतो. 

कैरीची चटणी - 

पंतप्रधानांना जेवणासोबत कैरीची चटणी खाणं हे आवडीचं आहे. कैरी किसून बनवण्यात येणारी ही चटणी चवीलाही उत्तम असते.

बदाम, पिस्ता श्रीखंड -

बदाम, पिस्ता श्रीखंड पंतप्रधानांच्या आवडीचं असल्याची माहिती आहे. हे खायला काहीप्रमाणात गोड आणि अतिशय स्वादिष्ट असतं.