कमाल आर खानने त्याच्या कॅन्सरबद्दल केला नवा खुलासा !

कमाल आर खान म्हणजेच केआरके हा ट्विटरवर वादग्रस्त ट्विट्स करून सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Updated: Apr 10, 2018, 10:43 AM IST
कमाल आर खानने त्याच्या कॅन्सरबद्दल केला नवा खुलासा ! title=

मुंबई : कमाल आर खान म्हणजेच केआरके हा ट्विटरवर वादग्रस्त ट्विट्स करून सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

काही दिवसांपूर्वी कमाल आर खानने केलेल्या ट्विटमुळेच पुन्हा तो चर्चेचा विषय बनला आहे. 

कॅन्सरच्या ट्विटमुळे पुन्हा चर्चा  

काही दिवसांपूर्वी कमाल आर खानने त्याला अंतिमटप्प्यातील कॅन्सर असून तो अवघ्या काही वर्षातच या जगाचा निरोप घेणार आहे. अशा आशयाचे ट्विट केले होते. कमाल आर खानने तो कोणाचेही फोन घेणार नाहीत. भविष्यात त्याच्या परिवारासोबत शेवटचा वेळ घालावणार आहे असेही म्हटले होते.  

कमाल आर खानच्या आरोग्याबाबत नवे अपडेट्स  

कमाल आर खानने त्याच्या आरोग्याबाबत आता पुन्हा नवा खुलासा केला आहे.  आता आरोग्याबाबत मी 100 % टक्के खरी माहिती देत आहे. तिसर्‍या रिपोर्ट्सनुसार, केआरकेने त्याला पहिल्या टप्प्यातील कॅन्सर असून येत्या सहा महिन्यात मी कॅन्सरवर मात करून बाहेर पडेन असे म्हटले आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचा मी स्विकार करतो, धन्यवाद ! असे ट्विट केआरकेने केले आहे. 

 

ट्विटरवर पंगा 

कमाल आर खानचे ट्विट हे सतत वाद निर्माण करणारे असतात त्यामुळे काही दिवसांपूर्वी केआरकेचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले होते. त्यानंतर केआरकेने  केआरके बॉक्स ऑफिस या ऑफिशिअल अकाऊंटवरून ट्विट केले आहे.

कमाल खानने शेअर केली होती शेवटची इच्छा

एखादी 'ए' ग्रेड फिल्म निर्मित करण्याची आणि अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची इच्छा आता माझ्यासोबतच संपणार असल्याचं त्याने  काही दिवसांंपूर्वी केलेल्या

 ट्विटमध्ये म्हटलं आहे.