शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या

सकाळी उठून फक्त 'या' गोष्टीचे सेवन करा, कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात 

Updated: Aug 29, 2022, 05:48 PM IST
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या  title=

मुंबई :  शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. त्यातीलचं एक उपाय म्हणजे लेमनग्रास. लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे, जी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याचा सुगंध लिंबासारखा असतो, त्यामुळे त्याला लेमनग्रास म्हणतात.लेमनग्रासचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते कसे ते जाणून घेऊयात. 

लेमनग्रासमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात. या वनस्पतीचे सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लेमनग्रासमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. इतकेच नाही तर लेमनग्रास तणाव, चिंता इत्यादी कमी करण्यास देखील मदत करते. 

लेमनग्रास  चहा
लेमनग्रास चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लेमनग्रास चहा मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरात जळजळ कमी होते. लेमनग्रासमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड आणि आयसोरिएंटिन सारख्या जळजळांशी लढणारे संयुगे असतात.रोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कायम राहते. उलटी, पोटदुखी, वजन नियंत्रणात आणण्यातही ही वनस्पती फायदेशीर ठरते.  
 
अशी बनवा चहा  
लेमनग्रास चहा बनवण्यापूर्वी लेमनग्रास कापून चांगले स्वच्छ करा. एका पातेल्यात पाणी उकळा. उकळी आली की त्यात चिरलेला लेमनग्रास घाला. 5 ते 7 मिनिटे चांगले उकळल्यानंतर ते एका कपमध्ये गाळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस, रॉक मीठ आणि मध घाला. सामान्य चहाप्रमाणे नियमितपणे प्या.

लेमनग्रास तेल
लेमनग्रास तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात दोन थेंब लेमनग्रास तेल प्यायल्याने अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील घाण साफ होऊन रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)