मुंबई : सध्या लांब दाढी आणि मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. आज अनेक तरुण दाढी आणि मिशी ठेवतात. ती आता एक फॅशन बनली आहे. अनेक अभिनेते, नेते आणि इतर मंडळी देखील मोठी दाढी ठेवतात. पण आता कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत.
मेलेनिन हे एक रंगद्रव्य आहे जे डोळे, केस आणि त्वचेचा नैसर्गिक रंग आणि चमक टिकवून ठेवते. जेव्हा ते आपल्या शरीरात कमी होऊ लागते तेव्हा केस, डोळे आणि त्वचेचा रंग प्रभावित होऊ लागतो. त्यामुळे तुमच्या आहारात बेरी आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
बहुतेक तरुण धूम्रपान आणि मद्यपान करतात. त्यामुळे लहान वयातच डोक्याचे आणि दाढीचे केसही पांढरे होऊ लागतात. धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे केसांच्या मुळापर्यंत रक्तप्रवाह नीट होत नाही.
अनेक लोकांचे लहान वयातच केस पांढरे होत आहेत. पण हे अनुवांशिक देखील असू शकते. तुम्ही तुमच्या आहारात आणि व्यायामामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांचा समावेश करावा.
(अस्वीकरण : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. झी मीडिया या उपायांची पुष्टी करत नाही.)