मुंबई : भारत हा असा देश आहे जिथं मूल न होण्यासाठी अनेकदा महिलांना जबाबदार धरलं जातं. परंतु हे नेहमीच खरं असेल असं नाही. पुरुष-प्रधान समाजात पुरुषांची कमतरता असली तरी त्यांना दोष दिला जात नाही. अनेक प्रकरणांमधून असं समोर आलंय की, विवाहित पुरुषाची प्रजनन क्षमता इतकी कमकुवत असते की, ते अपत्य जन्माला घालू शकत नाही.
सामान्यतः जेव्हा पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते, तेव्हा व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी याला कारणीभूत मानल्या जातात. या गोष्टी बऱ्याच अंशी खऱ्या मानल्या जातात.
त्याचप्रमाणे, लग्नानंतर पुरुषांची जबाबदारी खूप वाढते, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार पेलण्यासाठी ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्पर्म्सची संख्या, गुणवत्ता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढलेली दिसते. परंतु या समस्येचे काही कारण असू शकतं.
दरम्यान काही वर्षांपूर्वी एका संशोधनातून असं समोर आलं होतं की, पुरुषांची प्रजनन क्षमता विशिष्ट कारणामुळे कमी होऊ शकते. हवामान बदलामुळेही हे शक्य असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे. जगातील झपाट्याने बदलणारे हवामान पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करत आहे, ज्याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाही.
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुले होऊ शकतात.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप होण्याची शक्यता कमी होऊ लागते