Belly Fat Loss: आजच्या काळात वाढते वजन ही गंभीर समस्या आहे. बदलत्या लाइफस्टाइलमुळं वजन वाढते तसंच, अतिप्रमाणात जंक फुडचे सेवन व व्यायामाचा अभाव यामुळं पोटाची चरबी वाढते. सलग आठ ते नऊ तास बसून काम केल्यानेही पोट पुढे येते. पोट कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. व्यायाम करुनही जर आहार योग्य घेतला नाही तरी वजन कमी होत नाही. त्यासाठी व्यायाम आणि डाएट घेणेदेखील गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी एक ठराविक रुटिन फॉलो करा. आज आम्ही तुम्हाला अशा एका मसाल्याबद्दल सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने पोट आत जाईल. वजन कमी करण्याबरोबरच बॅली फॅट कमी होण्यासही फायदेशीर ठरणार आहे.
तुमच्या स्वयंपाकघरात सापडणारे मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यात पोटॅशियम, मॅग्शिशियम, फॉस्फोरस, फोलेट, फायबर आणि कॅल्शियमसारखे तत्व आढळले जातात. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुमचं मेटाबॉलिज्मदेखील वाढवतात. त्यामुळं शरीराचे वजन कमी करण्यास मदत मिळते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
मेथीच्या दाण्यांचे सेवन कसे करावे, याबाबतही अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. सगळ्यात आधी एक चमचा मेथीचे दाणे धुवून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याच्या आधी हे मेथीचे पाणी गाळून प्या. रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने चरबी झपाट्याने कमी करण्यास मदत होते. दररोज रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास वजन झपाट्याने कमी होते. तुम्ही अशा प्रकारे याचे सेवन केल्यास तुम्हालाच फरक जाणवायला लागेल.
वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आहार. जर तुम्ही आहार संतुलित ठेवला तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. वाढत्या वजनामुळं हृदयविकार व उच्च रक्तदाब अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळं वजन नियंत्रणात ठेवणे खूप फायदेशीर आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)