Winter yogasan : हिवाळ्यात फिट (Winter yogasan) राहण्यासाठी अनेक जण व्यायाम करतात. काही लोक जीमला जातात, तर काही लोक योगा करतात. मात्र अनेकांना जीमसाठी उठायला कंटाळा येतो. त्यामुळे त्यांच रूटीन काही बनत नाही. मात्र योगा करणाऱ्यांना ते घरच्या घरी करता येते. आज आम्ही तुम्हाला अशी काही योगासने (Winter yogasan) सांगणार आहोत जे घरच्या घरी केल्याने तुम्ही एकदम फिट व्हाल. ही योगासने कोणती आहेत, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : तुरटीचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे शरीर कडक होते. ज्यामुळे तुम्हाला काही करावेसे वाटत नाही, फक्त झोपावेसच वाटते. अशा परिस्थितीत शरीरात चपळता आणण्यासाठी काही आरोग्यदायी दिनचर्येची मदत घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचा आळस दूर होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 योगासनांबद्दल (Winter yogasan) ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल आणि कडकपणा देखील दूर होईल.
पदहस्तासन : पदहस्तासन केल्याने तुमचे हृदय (Heart) मजबूत होते. शिवाय पोटाची चरबी (Fat) कमी आणि पचन समस्या दूर होते. तसेच या आसनाने उंची देखील वाढते.
अधोमुख स्वानासन : अधोमुख स्वानासन केल्याने तुमच्या खालच्या ओटीपोटाचे स्नायू खूप मजबूत होतात. यासोबतच मणक्याची हाडेही मजबूत होतात. यामुळे स्नायूंमध्ये ताण येतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. असे केल्याने हात आणि पाय टोन होतात. यामुळे यकृत, किडनीचे आजार होत नाहीत.
चक्रासन : चक्रासन केल्याने तुमचे वजन (weight loss) नियंत्रणात राहते आणि त्याचबरोबर शरीर लवचिकही होते. असे केल्याने पाठीचा कणा सरळ राहतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)