सिनेमागृहात तुम्ही या '५' चूका केल्याने बिघडू शकते आरोग्य

  यंदाचा ख्रिस्मस आणि नववर्ष हे विकेंडला जोडून आले आहेत. यामुळे सलग दोन लॉंग़ विकेन्डला असल्याने अनेकजण चित्रपट पहाण्याचा प्लॅन करणार आहेत.

Updated: Dec 22, 2017, 10:13 PM IST
सिनेमागृहात तुम्ही या '५' चूका केल्याने बिघडू शकते आरोग्य  title=

मुंबई :  यंदाचा ख्रिस्मस आणि नववर्ष हे विकेंडला जोडून आले आहेत. यामुळे सलग दोन लॉंग़ विकेन्डला असल्याने अनेकजण चित्रपट पहाण्याचा प्लॅन करणार आहेत.

चित्रपट हे सिनेमागृहांमध्येच बघण्यात खरी मजा असते. म्हणूनच या चूका करणं टाळा  

एसी - 

सिनेमागृहांमध्ये हमखास एसी असतो. सलग २-३ तास  एसीत बसणं  त्रासदायक ठरू शकते. यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही सिनेमा पहायला जाणार असाल तर तुमच्याकडे जॅकेट, शाल ठेवा. 

पॉपकॉर्न  - 

सिनेमागृहात गेलात तर पॉपकॉर्न विकत घेण्याचा मोह होतो. नकळत आपल्या आहारामध्ये जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढते.  पॉपकॉर्नमधील साखर, मीठाचे अतिप्रमाण त्रासदायक ठरू शकते.  

शीतपेय  

सिनेमागृहांमध्ये एसी सुरूच असतो. त्यामध्ये थंड पेय किंवा खूप बर्फ असलेले पेय पिणे टाळा. यामुळे घशाचे  त्रास वाढतात. तसेच सर्दी, खोकला, सायनसचा त्रास वाढू शकतो.  

३ डी ग्लासचा वापर  - 

३ डी चित्रपट पाहणं हा अप्रतिम अनुभव असतो. पण त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. केवळ स्टरलाईज किंवा पॅक्ड ३ डी ग्लास वापरा.  

फ्रन्ट सीट टाळा - 

चित्रपटगृहामध्ये पुढच्या सीट निवडणं टाळा. पुढल्या रांगेत बसून चित्रपट पाहिल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सोबतच स्क्रीन पाहण्यासाठी मान वरच्या बाजुला करावी लागते.त्यामुळे पाठीच्या कणावर दाब येतो.