Mobile Addiction: तुमची मुलंही सतत मोबाईलमध्ये डोकावतात? अशी दूर करा ही वाईट सवय

 तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागले आहे, तर येथे दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. 

Updated: Oct 14, 2022, 04:42 PM IST
Mobile Addiction: तुमची मुलंही सतत मोबाईलमध्ये डोकावतात? अशी दूर करा ही वाईट सवय  title=
Mobile Addiction Are your kids constantly staring at their mobile phones nz

Parenting Tips: मोबाईलचा वापर काळाची गरज आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. अगदी लहान मुलांनासुद्धा मोबाईल सहज वापरता येतो. हल्लीची मुलं नंतर चालायला शिकतात पण मोबाईल वापरायला आधी शिकतात. फोनमध्ये गाणी कशी ऐकायची, व्हिडीओज कसे पाहायचे, किंवा लोकांच्या नाच-गाण्याचे रील्स कुठे बघायचे हेही लहान वयातच मुलांना माहित झालेलं असतं. त्यांना यासाठी वेगळं शिकवण्याची गरज नाही. (Mobile Addiction Are your kids constantly staring at their mobile phones nz)

आणखी वाचा -  Health Tips: या लोकांनी चुकूनही सायकल चालवू नये.. नाहीतर या समस्यांना सामोरे जावे लागेल

 

सुरुवातीला कौतूक देखील वाटू शकते, आमच्या मुलाने या लहान वयातच तंत्रज्ञानावर चांगली पकड निर्माण केली आहे, परंतु जेव्हा मुलाला सतत मोबाईलला चिकटून राहण्याची सवय लागते तेव्हा खऱ्या अडचणी सुरू होतात. अनेकदा मुलांकडून मोबाईल हिसकावून घेतल्यास तर ती रडायला लागतात. तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागले आहे, तर येथे दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. 

मुलाचे मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे | How To Break Kid's Mobile Addiction 

1. स्क्रीन वेळ मर्यादित करा

आजकाल मुलांना शाळेच्या कामातही फोन वापरणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत त्यांना फोनपासून पूर्णपणे दूर ठेवता येत नाही. म्हणूनच मुलांसाठी स्क्रीन टाइम मर्यादित करणे महत्त्वाचे आहे. काही वेळासाठी मुलांना फोनचा वापर करायला द्या आणि त्यानंतर त्यांना फोन वापरू देऊ नका. यामुळे त्यांची सतत फोनवर राहण्याची सवय नाहीशी होईल. 

2. घरातील योग्य जागा

घरातील कोणत्या जागेत फोनचा वापर केला पाहिजे यावर ही लक्ष देणे तितकंच महत्त्वाचे आहे. शक्यातो मुलांना डायनिंग टेबलवर, स्टडी टेबलवर किंवा बेडवर मोबाईल वापरू देऊ नका. 

3. चुकीचे हट्ट पुरवू नका

मुलाने कितीही तुमच्यासमोर हट्ट केला किंवा नाराजी व्यक्त केली तरी तुम्ही फोन वापरायला देऊ नका. जर मुल रडायला लागले आणि त्याला गप्प करण्यासाठी जर तुम्ही त्यांना फोन वापरायला दिला तर कदाचित त्यांच्या सवयीत सुधार होण्याऐवजी सवय बिघडली जाईल यामुळेच अनेक परिणामांना सोमोरे जावे लागेल.

आणखी वाचा - IRCTC ने पर्यटकांसाठी आणलं नवीन पॅकेज, जाणून घ्या काय आहे ऑफर

 

4. मोबाईल पासून लांब ब्रेक

ज्या दिवशी मुलांच्या शाळांना सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये मुलांना मोबाइलपासून एक-दोन दिवस लांब राहण्याचा ब्रेक द्या. त्यामुळेच का होईना मुलांमध्येही संयम येईल. 

5. एक चांगला आदर्श व्हा

पालक मुलांसमोर जसं वागतात तेच मुलं शिकतात. जर तुम्ही स्वत:ला सतत मोबाईलमध्ये गुंतवून ठेवले तर मुले या गोष्टी शिकतील. म्हणूनच मोबाईलपासून दूर राहण्याची सवयही लावणे गरजेचे आहे.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)