देशातील 'या' राज्यात सापडला Monkeypox चा पहिला रुग्ण?

विद्यार्थ्याला सध्या आयसोलेट केलं असून त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. 

Updated: Jul 9, 2022, 11:28 AM IST
देशातील 'या' राज्यात सापडला Monkeypox चा पहिला रुग्ण?  title=

मुंबई : ज्याची भीती होती तेच होत की काय अशी एक शंकेची पाल चुकचुकत आहे. याचं कारण म्हणजे कोरोनासोबत Monkeypox ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आता मंकीपॉक्स भारतात पोहोचला की काय अशी शंका उपस्थित होतं आहे. 

कोलकाता इथे पहिला मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा विद्यार्थी असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 

हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी युरोपिय देशातून परतल्याची माहिती मिळाली होती. तो पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्हातील रहिवासी आहे. त्याच्या शरीरात मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली आहेत. 

विद्यार्थ्याला सध्या आयसोलेट केलं असून त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही सगळी लक्षणं मंकीपॉक्सची असल्याचा डॉक्टरांना संशय आहे. सुरुवातीची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखी दिसतात. शरीरावर पुरळही उठली आहेत. त्याचा नमुनाही घेण्यात आला आहे.