World Health Organization on Measles news in marathi : जग आता कुठे तरी कोरोना महामारीतून सावरत आहे. 2020 मध्ये कोरोनाची सुरुवात झाली. या महामारीने जगभरात कहर माजवला होता. जगभरात कोरोना महामारीमुळे सुमारे 25 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोविड लस उपलब्ध झाली त्यामुळे याचा प्रसार आटोक्यात आला. दरम्यान भविष्यातही महामारी संकट घोंघावत असल्याचा दावा जगभरातील शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने आणखी एक धक्कादायक इशारा दिला आहे. तो म्हणजे गोवर हा आजार..
वर्षाच्या अखेरीस जगातील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये गोवरची लागण होण्याचा धोका जास्त किंवा खूप जास्त असेल असा इशारा WHO ने दिला आहे. कोविड लसीमुळे ज्या भागात गोवरचे नियमित लसणीकरण वगळण्यात आले होते अशा बहुतांश भागात गोवरची प्रकरणे वाढताना दिसत आहे. शक्यतो लहान मुलांना या आजाराने जास्त प्रभावित केले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
गोवर हा विषाणूजन्य आजार आहे. हा एक संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा विषाणू लाळेच्या थेंबातून हवेत पसरतो आणि इतर लोकांना संक्रमित करतो. सुरुवातीला या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. पण संसर्ग झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये जगातील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये गोवर होण्याची शक्यता आहे. WHO ने रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या सहकार्याने हा डेटा तयार केला आहे. आकडेवारीनुसार, असा अंदाज आहे की, वर्षाच्या अखेरीस जगातील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये काउ पॉक्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होईल. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकरणे आधीच 79% वाढून 3 लाखांहून अधिक झाली आहेत. हा डेटा रुग्णालयांमधील माहितीवर आधारित आहे.
खोकला येणे, वाहती सर्दी किंवा उच्च ताप, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, घास दुखणे, तोंडात पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, अंग दुखणे अशी गोवरच्या आजाराची लक्षणे आहे.
गोवरकच्या लक्षणांमध्ये ओटिटिस मीडिया, ब्रॉन्कोप्न्यूमोनिया, लॅरिन्गोट्राकेओब्रॉन्कायटिस, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. त्यामुळे निरोगी मुलांमध्येही गंभीर आजार होऊ शकतात. यासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे. गुरांच्या प्रत्येक 1,000 प्रकरणांपैकी एक तीव्र एन्सेफलायटीस विकसित करतो, ज्यामुळे मेंदूला गंभीर नुकसान होते. गोवरची लागण झालेल्या प्रत्येक 1,000 मुलांपैकी तिघांचा श्वसन आणि न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशनमुळे मृत्यू होऊ शकतो.
विशेष म्हणजे गोवर आजारावर कुठलाही उपचार नसून आवश्यक ती काळजी घेणं हा यावरचा उपाय आहे. याशिवाय रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरून यावर उपचार केले जातात. जसं की सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यावर औषध किंवा गोळ्या दिल्या जातात. यावेळी रुग्णांनी या आजारापासून बरे होण्यासाठी आवश्यक ती विश्रांती घेणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.