Mumbai Measles Outbreak: गोवरचा आणखी एक बळी; मृत बालकांची संख्या 15 वर

गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत.

Updated: Nov 29, 2022, 10:22 PM IST
Mumbai Measles Outbreak: गोवरचा आणखी एक बळी; मृत बालकांची संख्या 15 वर

Measles Outbreak : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत गोवरची (Measles) साथ पसरलीये. लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असून मंगळवारी अजून एका बालकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत. लहान मुलांशिवाय मोठ्या व्यक्तींमध्येही गोवरचं प्रमाण दिसून आलंय.

मुंबईत गोवरचं थैमान (Measles Outbreak)

मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती आहे. वडाळ्यातील 5 महिन्याचा मुलाचा गोवरने मृत्यू झालाय. या मृत्यूमुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे गोवरबाधित रूग्णांची एकूण संख्या 308 वर पोहोचली आहे.

गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचं (measles child) आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

गोवरची काय लक्षणं दिसून येतात?

  • ताप
  • खोकला
  • घसा दुखणं
  • अंग दुखणं
  • डोळ्यांची जळजळ होणं
  • डोळे लाल होणं
  • 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणं

गोवरचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?

ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसंच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो. 

4 कोटी मुलांना चुकवला गोवर डोस

नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे, जगभरातील जवळपास 4 कोटी मुलांनी गोवरचा डोस चुकवला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या आकडेवारीनुसार जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अजून मिळू शकलेला नाहीये. तर दुसरीकजे 1.5 कोटी मुलांना गोवरच्या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाहीये.