Bad Breath : तोंड उघडताच दुर्गंधी येतेय, 'या' घरगूती गोष्टी करून पाहा

तुम्हाला तुमचे तोंड व्यवस्थित स्वच्छ करण्याची सवय लावावी लागेल. दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करायला विसरू नका. तुम्ही माउथवॉश देखील वापरू शकता. याशिवाय कोमट मिठाच्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ होतात.

Updated: Nov 29, 2022, 10:21 PM IST
 Bad Breath : तोंड उघडताच दुर्गंधी येतेय, 'या' घरगूती गोष्टी करून पाहा title=

Bad Breath Home Remedies : अनेकांना तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतावत असते. यामुळे त्यांची मित्र-मैत्रिणींसमोर बोलताना गच्छती होत असते. या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. या समस्येपासून तुमची सुटका करण्यासाठी आम्ही काही घरगूती उपाय सांगणार आहोत. या उपायाद्वारे तुम्ही तुमच्या तोंडातली दुर्गंधी दुर करू शकता. त्यामुळे हे उपाय काय आहेत, हे जाणून घेऊयात.  

श्वासाच्या दुर्गंधीवर घरगुती उपाय

'ही' गोष्ट करा

तुम्हाला तुमचे तोंड व्यवस्थित स्वच्छ करण्याची सवय लावावी लागेल. दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करायला विसरू नका. तुम्ही माउथवॉश देखील वापरू शकता. याशिवाय कोमट मिठाच्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ होतात.

लवंग

दिवसभरातून थोड्या-थोड्या अंतराने लवंग चावत चला. लवंग बॅक्टेरियाशी लढून दात स्वच्छ करते. तसेच दातांच्या समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. लवंग खाल्ल्याबरोबर तिचा सुगंध तोंडात विरघळतो आणि दुर्गंधी दूर होते. 

सफरचंद आणि गाजर

लसूण किंवा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते, त्याचप्रमाणे सफरचंद आणि गाजर खाल्ल्यानंतर तोंडाची दुर्गंधी दूर होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बारीक करून दातांवर घासून स्वच्छ धुवा. यामुळे दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधीही दूर होईल.

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगारचा वापर श्वासाच्या दुर्गंधीपासून त्वरित सुटका करण्यासाठी केला जाऊ शकतो. एक ग्लास पाण्यात 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि तोंडात थोडे पाणी घेतल्यावर इकडे-तिकडे थुंका. पूर्ण ग्लासभर पाण्याने हे करा. 

वेलची

लवंगाप्रमाणेच वेलचीच्या बिया चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. दिवसातून 3 ते 4 वेळा ते चावा. तुम्हाला हवे असल्यास गरम पाण्यात वेलची टाकूनही हे पाणी पिऊ शकता.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)