मूतखड्याचा त्रास दूर करणारे नैसर्गिक उपाय

आजकाल सतत वातानुकूलित वातावरणात बसून सतत काम करण्याची सवय असल्याने पाणी पिण्याची सवय कमी होते. 

Updated: Jul 3, 2018, 05:26 PM IST
मूतखड्याचा त्रास दूर करणारे नैसर्गिक उपाय  title=

मुंबई : आजकाल सतत वातानुकूलित वातावरणात बसून सतत काम करण्याची सवय असल्याने पाणी पिण्याची सवय कमी होते. शरीर पुरेसे हायड्रेटेड नसल्यास पाण्याची कमतरता जाणवते. यामधूनच हळूहळू शरीरात मूतखडा म्हणजेच किडनीस्टोनचा त्रास बळावतो.  

किडनीस्टोनचा त्रास वेदनादायी असतो. या त्रासातून विना शस्त्रक्रिया बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. मात्र वेळीच मूतखड्याच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास ते अधिक भयंकर होऊ शकते. 

मूतखड्याच्या समस्येवर नैसर्गिक उपाय - 

 

पानफूटी -

मूतखड्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पानफूटी ही वनस्पती फायदेशीर ठरते. 
सकाळ संध्याकाळ पानफूटीच्या पानामध्ये काळामिरीचे दाणे मिसळून ते चावून खा.

नियमित किमान 21 दिवस हा उपाय केल्याने मूतखड्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

मूतखड्याच्या समस्येवर फायदेशीर भाज्या -  

मूतखड्याचा त्रास असल्यास आहारात भाकरीसोबत कारलं, मूळ्याच्या भाजीचा समावेश करावा. 

गजकं - 

गजकं फोडून त्यामधील बी, मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरतं.  

काकडीचं बी - 

काकडीचं बी बारीक करून रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे बी खावं. नियमित 21 दिवस हा उपाय केल्याने मूतखड्याचा त्रास नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते.  

महत्त्वाची टीप - सदर उपाय हे 'आपली माती आपली मानस' या युट्युब चॅनलवर सांगितले. हे केवळ घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 'झी 24 तास' कोणत्याही उपायांच्या परिणामांची जबाबदारी घेत नाही.  व्यक्तीपरत्वे उपायांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.