वयाच्या 59 व्या वर्षी नीता अंबानी यांनी 2 पदार्थ खाऊन घटवलं 18 किलो वजन

Nita Ambani Weight Loss : गडगंज श्रीमंत असलेल्या नीता अंबानी यांनी साठीच्या उंबरठ्यावर तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्ते हे 2 पदार्थ खाऊन हे वजन कमी केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 12, 2023, 01:21 PM IST
वयाच्या 59 व्या वर्षी नीता अंबानी यांनी 2 पदार्थ खाऊन घटवलं 18 किलो वजन

Nita Ambani Reduce Weight : नीता अंबानी फिटनेस आणि लूक बाबतीत आपल्या सुना आणि लेकींना देखील मागे टाकतात. याचं रहस्य आहे त्यांचा फिटनेस. नोव्हेंबर महिन्यात साठी गाठणाऱ्या नीता अंबानी यांनी तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एकेकाळी नीता अंबानी यांच वजन खूप वाढलं होतं. पण आता वेट लॉसनंतर त्या सगळ्यांनाच प्रेरणा देत आहेत. नीता अंबानी यांचा डाएट नक्की काय होता, हे जाणून घेणार आहोत. 

नीता अंबानी यांनी काय केलं?

नीता अंबानी या वयात देखील अतिशय फिट आहेत. यामागचं गुपित त्यांचा आहार आणि योग्य जीवनशैली. नीता अंबानी वजन कमी करण्यासाठी आहारात अधिक फळांचा, फुलांचा आणि सुकामेव्याचा समावेश करतात. एवढंच नव्हे तर नीता अंबानी दररोज एक्सरसाईज देखील करतात. यामध्ये जीम, योगा, स्विमिंग आणि वर्कआऊटचा समावेश आहे. 

या ज्यूसचा समावेश 

बीट हे पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. बाजारात बीट सहज उपलब्ध होतात. नीता अंबानी यांनी वजन कमी करण्यासाठी बीटाच्या ज्यूसची मदत घेतली. नीता अंबानी दररोज एक ते दोन ग्लास बिटाचे ज्यूस प्यायच्या. बिटाच्या रसाने फक्त बॉडी डिटॉक्स होते असं नाही तर पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील योग्य प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस खूप मदत करतो. 

या छंदाने केली मदत 

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, नीता अंबानी यांना नृत्याची आवड आहे. NMACC या सेंटरची निर्मिती करून आपली नृत्याची आवड जोपासली आहे. नीता अंबानी यांना अनेकदा स्टेजवर परफॉर्मन्स देताना पाहिले आहे. नीता अंबानी यांनी भरतनाट्यम आणि क्लासिकल यांचे प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे शरीरात सकारात्मक बदल होतोना त्यांना पाहिले आहे. 

या सवयी महत्त्वाच्या 

नीता अंबानी फिट राहण्यासाठी सकाळी लवकर उठतात. उशिरापर्यंत झोपून राहणे त्यांना आवडत नाही. म्हणून दिवस अतिशय सक्रिय असतो. सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट व्यायाय असतो. त्या दररोज 40 मिनिटे व्यायाम करतात. नृत्य नेहमीच त्यांच्यासोबत असते. तसेच आहार अतिशय सामान्य असतो 

या व्यक्तीला दिले प्रोत्साहन

नीता अंबानी यांचा मोठा मुलगा अनंत अंबानीचे वजन देखील अधिक आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नीता अंबानी यांनी वेट लॉसचा प्रवास सुरू केला. अनंतला वजन कमी करण्याच्या प्रवासात सोबत देण्यासाठी नीता यांनी देखील ही जर्नी सुरू केले. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More