आता घरीच कळणार गर्भातील बाळाची अवस्था

संशोधनातून समोर आली गोष्ट 

आता घरीच कळणार गर्भातील बाळाची अवस्था  title=

मुंबई : गर्भावस्थेत बाळाची हालचाल आणि तब्बेत जाणून घेणं ही प्रत्येक आईची तळमळ असते. गर्भावस्थेत बाळाची हालचाल जाणून घेण्यासाठी प्रत्येकवेळी आईला डॉक्टरांवर अवलंबून रहावं  लागतं. अनेकदा गर्भावस्थेत महिलेला बाळाचा हालचाल न झालेली किंवा गर्भावस्थेतच बाळ दगावलं तरी त्याची जाणीव होत नाही. अशावेळी या महिलेला तिच्या गर्भातील गर्भाची माहिती मिळावी अशी सोय झाली आहे. 

आजा जन्माला न आलेल्या बाळाची तब्बेत किंवा स्वास्थ डॉक्टरकडे न जाता समजू शकणार आहे. संशोधकांनी आता एक असं सेन्सर तयार केलं आहे की, ज्यामध्ये गर्भवती महिला आपल्या घरीच आपल्या गर्भाच्या हृदयाचे ठोके पाहू शकणार आहे. यावरून आईला बाळाची गर्भातील अवस्था कळणार आहे. 

ब्रिटनच्या ससेक्स विद्यालयातील हे संशोधन आहे. या सेन्सरद्वारे गर्भवती महिलेला बाळाच्या हृदयातील ठोके आणि त्याला जन्मजात असलेल्या त्रासाबद्दल कळणार आहे. याद्वारे बाळाची प्री - मॅच्युअर डिलीवरीची आवश्यकता असली तरीही त्याची माहिती मिळणार आहे.

गर्भवती महिलेला अशा सेन्सरचा फायदाच होणार आहे. ज्या महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय रिस्क फॅक्टर असलेला आजार ज्या महिलांना याचा त्रास होत आहे. त्यांच्याकरता हे सेन्सर अतिशय फायदेशीर आहे. गर्भावस्थेत त्या गर्भाचं योग्य परिक्षण केलं जाणं शक्य आहे. 

अशी करू शकता पाहणी 

संशोधनकर्त्यांनी दावा केला आहे की, नवीन इलेक्ट्रोमीटर आधारित असलेल्या एम्पलीफायर प्रोटोटाइपला इलेक्ट्रिक पोटेंशिअल सेंसिंगच्या आधारे तयार करण्यात आळं आहे. ज्याद्वारे गर्भातील बाळाची तपासणी करता वापरले जाणार आहे. गर्भवती महिला या उपकरणाला आपल्या पोटावर ठेवून गर्भातील भ्रूणाच्या इलेक्ट्रो कार्डियोग्रामवर नजर ठेवण्यात मदत होईल.