Protein Powder For Child : वाढत्या मुलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा त्रास होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांची हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होतो किंवा ते अत्यंत कमकुवत होतात. कॅल्शियम हे एक खनिज आहे जे मुलांच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम हाडांची ताकद, मानसिक कार्यक्षमता, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी देखील आवश्यक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, मुलांना हात-पायांमध्ये मुंग्या येणे, हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो आणि दातांचा बाहेरील थर खराब होतो. डॉ. निताशा गुप्ता यांनी सोशल मीडियावर घरगुती प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर केली आहे. जी 6 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॅल्शियम पावडर म्हणून उपयुक्त ठरत आहे. ही पावडर कशी बनवायची याची रेसिपी सांगितली असून यामुळे मुलांमध्ये कधीही कॅल्शियमची कमतरता होणार नाही. जाणून घ्या ही पावडर कशी बनवता येते.
मुलांना कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून ही पावडर बनवा. डॉक्टर निताशाच्या म्हणण्यानुसार पावडर बनवण्याची सामुग्री आणि रेसिपी
या पावडरने लहान मुलांनाही खीर किंवा प्रोटीन ज्यूस बनवता येते.
प्रोटीन बनवण्यासाठी एका भांड्यात चतुर्थांश ग्लास दूध घ्या आणि त्यात 2 चमचे तयार पावडर टाका
डॉ. निताशा यांच्या म्हणण्यानुसार, ही पावडर 6 वर्षे ते 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना खाऊ घालू शकते. यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही आणि मुले तंदुरुस्त आणि निरोगी राहतात.
मखानामुळे मुलांच्या शरीरात ताकद वाढेल. हृदयाचे आरोग्य राहिल उत्तम. मुलांच्या शरीरात ताकद, ऊर्जा आणि उत्साह वाढवण्यासाठी होतो फायदा
तूपामुळे शरीराला ताकद मिळते. तसेच सांध्यांमध्ये योग्यप्रकारे घर्षण होण्याकरिता तूपाचा फायदा होतो. तुपामुळे बाळाला शौचाला चांगली होते. तसेच ताकद वाढते.