ऑनलाईन शॉपिंगचा वाढता ट्रेंड; ही आहेत कारणे

टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीही ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. 

Updated: Apr 11, 2019, 04:59 PM IST
ऑनलाईन शॉपिंगचा वाढता ट्रेंड; ही आहेत कारणे  title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन शॉपिंगच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. आता या ऑनलाईन शॉपिंगला सर्वाधिक पसंती का देण्यात येते याबाबत काही माहिती समोर आली आहे. 

अलिकडे केल्या गेलेल्या एका संशोधनातून ऑनआईन शपिंगबाबत माहिती समोर आली आहे. टिव्ही  बघताना, सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असताना लोकांना ऑनलाईन शॉपिंग करण्याची इच्छा होते. टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीही ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. 

अमेरिकेतील इंडियाना यूनिवर्सिटीचे मार्केटिंग असिसटेंट प्रोफेसर बेथ एल फोसेन यांनी सोशल मिडियाचा वापर करताना टिव्हीवर येणाऱ्या जाहीराती बघताना अनेक लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाईन शॉपिंग ही सर्वसाधारण जाहीरात कोणत्या प्रकारची आहे त्यावर अवलंबून असते. जाहीरात कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या वस्तूवर आधारित आहे, भावनिक किंवा गंमतीशीर आहे यावरही ऑनलाईन शॉपिंग अवलंबून असते. 

फोसेन यांनी सांगितले की, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी टीव्ही, टॅबलेट, मोबाइल या विविध माध्यमांवरून जाहिराती पाहिल्या जातात. जाहीराती पाहणाऱ्या ग्राहकांना जाहिरातदार आपल्या साईटवरून खरेदी करण्यास प्रेरित करत असतात. 

खरेदी करण्याची वेळही ऑनलाईन शॉपिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. अर्धा तास दाखवण्यात येणारी जाहिरात ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ करण्यास मदत करतात. फोसेन आणि त्यांचे सहायक लेखक डेविड यांनी हे संशोधन गोवेजूटा बिजनेस स्कूलमध्ये केले. ज्यात जवळपास एक लाख इंटरनेट वापरकर्त्यांनी भाग घेतला होता. हे संशोधन ‘इन्फॉर्म्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.