Heart Attack Symptoms: छातीत दुखल्यावर लोकांना हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाटते. प्रत्येक वेळेस हे हृदयविकाराच्या झटक्याचेच लक्षण असेल असे नाही. पण यामुळे गोंधळ होणे साहजिक आहे. कारण हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ याचे लक्षण सारखेच आहे. दोन्ही वेळेस छातीत दुखते. कोची येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि आयएमए - केरळच्या रिसर्च सेलचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी हृदयविकाराचा झटका येणे आणि छातीत जळजळ होणे यातील फरक समजून घेण्यासाठी सोपे मार्ग सांगितले आहेत.
डॉ. राजीव जयदेवन यांच्यामते, छातीत जळजळ तेव्हाच होते जेव्हा पोटातील अॅसिड आणि अन्न अन्नाच्या नळीत परत येते. पण त्याच वेळी हृदयाचा रक्तपुरवठा खंडित झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. आणि यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. जाणून घेऊया छातीत जळजळ (हार्ट बर्न) आणि हृदयविकाराचा झटक्याची नेमकी लक्षणे.
छातीत जळजळ (हार्ट बर्न) होण्याची लक्षणे -
1. छातीत जळजळ होणे
2. आंबट ढेकर येणे
3. गिळताना त्रास होणे
4. अन्न परत घशात येणे
हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे -
1. छातीत तीव्र वेदना होणे
2. खुप घाम येणे
3. उलट्या होणे
4. श्वास घेण्यास त्रास होणे
5. चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे
1. छातीत जळजळ सामान्यापणे जेवल्यानंतर होते आणि झोपल्यानंतर ती जळजळ वाढते.
2. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदना खुप तीव्र असतात. त्यावेळी खुप घाम येतो आणि उलट्याही होतात.
3. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदना व्यायाम केल्यामुळे वाढू शकतात आणि आराम केल्यास कमी ही होऊ शकतात.
4. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदना मान, खांदा किंवा हातापर्यंत पसरू शकते.
जर तुमचे जास्त असेल तर छातीत जळजळ होणे हे हृदया संबंधीत समस्यांचे लक्षण असू शकते. पण तुम्ही जीवनशैलीत बदल करून छातीत होणारी जळजळ टाळू शकता. खाण्याच्या चुकीच्या सवयी जसे तळलेले पदार्थ, कॉफी, दारू टाळा आणि वजन नियंत्रणात ठेवा. संतुलित आहार घ्या.
तुम्हाला छातीत तीव्र वेदना होत असतील. त्या वेदना व्यायामाने वाढत असतील आणि विश्रांती घेतल्यास कमी होत असतील, तर तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)