शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट होऊ शकतो फ्रॅक्चर?

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट खरंच तुटण्याचा धोका असतो का?

Updated: Jul 8, 2021, 08:45 AM IST
 शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट होऊ शकतो फ्रॅक्चर?

मुंबई : युनायटेड किंगडममध्ये नुकतंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये जोडीदारासह शारीरिक संबंध ठेवले असता एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तुटल्याचं समोर आलं. यासंदर्भातील रिपोर्ट 'द सन'मध्ये छापण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का याबाबतीत मेडिकल सायन्सचं नेमकं काय म्हणणं आहे? 

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट खरंच तुटण्याचा धोका असतो का? तर याचं उत्तर 'होय' आहे. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला Penile Fracture म्हणतात.

Penile Fracture म्हणजे काय?

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं फ्रॅक्चर सामान्य फ्रॅक्चरपेक्षा भिन्न आहे. कारण, पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडं नसतात. त्यामुळे यामध्ये हाडांच्या बदली टिश्यूज फ्रॅक्चर होतात. पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या त्वचेखाली ट्यूनिका अल्बुगिनिया असतं. जे सेक्शुअल इंटरकोर्ससाठी लिंगाता आकार आणि कडकपणा वाढवण्यासाठी काम करतात. कधीकधी ट्यूनिका अल्बुजिनियाच्या खालील भागात इरेक्टाइल टिश्यू (Corpus Cavernosum) आणि क्वचित प्रसंगी यूरेथ्रा तुटण्याची शक्यता असते. Penile Fractureची प्रकरणं दुर्मिळ असली तरीही या परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे.

प्राइवेट पार्ट फ्रॅक्चर होण्यामागे कारण

जेव्हा एखादा असामान्य, अनैसर्गिक किंवा अधिक ताकदीने शारीरिक संबंध ठेवला असता किंवा कोणत्याही लैंगिक आघातामुळे पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. लैंगिक संबंधांदरम्यान, पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इरेक्शन आणि जास्त रक्तप्रवाहांमुळे, टिश्यू कठोर बनतात आणि असामान्य शक्ती किंवा ट्रॉमा यामुळे दुखापत होऊ शकते. 

प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याची लक्षणं

  • प्रायव्हेट पार्टचं इरेक्शन कमी होणं
  • प्रचंड वेदना
  • फ्रॅक्चर झालेला भाग काळा-निळा होणं
  • प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव
  • लघवी करताना वेदना होणं