चेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी

पुदिना ज्याप्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा लाभदायक ठरतो.

Updated: Jul 7, 2019, 07:47 PM IST
चेहऱ्याच्या त्वचेसाठी पुदिना अत्यंत गुणकारी title=

मुंबई : रोजच्या  आहारात पुदिन्याचा वापर करण्यात येतो. पुदिना ज्याप्रकारे आरोग्यास फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा लाभदायक ठरतो. आपल्या चेहऱ्याची त्वचाही शरिराच्या त्वचेपेक्षा फार नाजुक असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे फार गजजेचे आहे. पुदीना थंड प्रवृत्तीचा आणि रेचक असल्याने पचनकार्य सुरळीत करण्यासाठी त्याचा हमखास वापर केला जातो. पण हाच पुदीना त्वचेवरील तेज फुलवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.

- पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठीदेखील पुदीना फायदेशीर ठरतो. 

- पुदिन्याच्या पानांमध्ये 'मिन्थॉल' आणि 'अ‍ॅन्टी बॅक्टेरियल' गुणधर्म असतात. उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. चेहर्‍यावर अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्स, सनबर्न, त्वचा लालसर होणे अशा अनेक समस्यांवर पुदिना परिणामकारक आहे.
 
- त्वचेसाठी मुलतानी मातीचा उपयोग स्त्रिवर्ग करत असतो. प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. त्वचेतील तेल दूर करण्यासाठी, क्लिंजिंगसाठी मुलतानी मातीसोबतच पुदीनाही फायदेशीर ठरतो. 

- मुलतानी माती, ताजी पुदिन्याची पानं, मध आणि दही एकत्र करा. हे मिश्रण सुमारे २० मिनिटं त्वचेवर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये चेहरा धुवा. या पॅकमुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते. 

- गुलाबपाणीदेखील त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यास मदत करतात. यामधील दाहशामक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवते. पुदीन्याच्या पानांसोबत मध आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण देखील फायदेशीर आहे.